TRENDING:

‘तुम्ही माझे आदेश पाळलेच पाहिजेत’ भरसभेत मंत्री आणि महिला SP मध्ये जुंपली; नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

एक नाट्य रंगलं आहे, जिथे राज्याचे मंत्री अनिल विज आणि पोलीस अधीक्षक (SP) उपासना यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लोकशाहीमध्ये 'जनता जनार्दन' असते, असं आपण नेहमी म्हणतो. सरकारी कार्यालयांत किंवा पोलीस ठाण्यात जेव्हा एखादा सामान्य माणूस न्यायासाठी जातो, तेव्हा त्याला मिळणारी वागणूक आणि तिथल्या अधिकाऱ्यांची कर्तव्यदक्षता यावरच प्रशासनाचा कणा अवलंबून असतो. पण जेव्हा हेच न्याय देणारे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचा आरोप होतो आणि भरसभेत एक मंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यात 'अधिकारांच्या' मुद्द्यावरून जुंपते, तेव्हा मात्र मोठी खळबळ उडते.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

हरयाणामध्ये सध्या असंच एक नाट्य रंगलं आहे, जिथे राज्याचे मंत्री अनिल विज आणि पोलीस अधीक्षक (SP) उपासना यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.

ही घटना शुक्रवारी हरयाणातील कैथल येथे जिल्हा तक्रार निवारण समितीच्या (DGRC) बैठकीत घडली. या बैठकीत तीतरम गावचे रहिवासी मनदीप कुमार यांनी एका धक्कादायक तक्रारीचा पाढा वाचला. मनदीप यांच्या मते, त्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी एका सहाय्यक उपनिरीक्षकाला (ASI) 7 लाख रुपये दिले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे व्यवहार पूर्ण झाला नाही. जेव्हा मनदीप यांनी आपले पैसे परत मागितले, तेव्हा संबंधित पोलीस अधिकाऱ्याने चक्क नकार दिला.

advertisement

हे ऐकताच कॅबिनेट मंत्री अनिल विज यांचा पारा चढला. त्यांनी तातडीने संबंधित एएसआय संदीप कुमार याला निलंबित करण्याचे आदेश दिले. विज म्हणाले, "तपास सुरू असेपर्यंत या अधिकाऱ्याला निलंबित करा, कारण तो आपल्या पदाचा वापर करून तपासावर प्रभाव टाकू शकतो." मात्र, तिथेच उपस्थित असलेल्या एसपी (SP) उपासना यांनी मंत्र्यांच्या या आदेशाला कायदेशीर मुद्द्यावरून विरोध केला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, "सध्याच्या नियमांनुसार आणि माझ्या अधिकारक्षेत्रानुसार, त्या एएसआयला निलंबित करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही."

advertisement

एसपींच्या या उत्तराने अनिल विज अधिकच संतापले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. "हे माझे आदेश आहेत आणि ते संपूर्ण हरयाणामध्ये लागू होतात. तुम्ही माझे आदेश पाळलेच पाहिजेत." असं विज म्हणाले तर "मी पोलीस महासंचालकांना (DGP) पत्र लिहू शकते, पण स्वतःहून निलंबन करू शकत नाही." असं एसपींचे स्पष्टीकरण होते.

या वादाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे मंत्र्यांचा 'पब्लिक जस्टिस'चा सूर, तर दुसरीकडे महिला पोलीस अधिकाऱ्याने नियमांवर धरलेला आग्रह, अशा दोन टोकाच्या भूमिका तिथे पाहायला मिळाल्या.

वादाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनिल विज यांनी आपली भूमिका थोडी मवाळ केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "माझा हेतू फक्त जनतेला न्याय मिळवून देणं हाच आहे. मग ते मी असो किंवा कोणताही अधिकारी, आपण लोकांशी चांगलं वागलं पाहिजे. ज्याच्याकडे अधिकार आहे, त्याने त्या भ्रष्ट एएसआयला निलंबित करावं, इतकीच माझी मागणी आहे."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'घरच्यांनी घराबाहेर काढलं, तर तू तिला कसा सांभाळशील?' शाम अन् गीताची युनिक लव्हस
सर्व पहा

हे प्रकरण आता केवळ 7 लाखांच्या फसवणुकीपुरतं मर्यादित न राहता, 'मंत्री विरुद्ध पोलीस अधिकारी' असं वळण घेताना दिसत आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहेच, पण ती कायदेशीर प्रक्रियेनुसार व्हावी की मंत्र्यांच्या आदेशानुसार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

मराठी बातम्या/देश/
‘तुम्ही माझे आदेश पाळलेच पाहिजेत’ भरसभेत मंत्री आणि महिला SP मध्ये जुंपली; नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल