TRENDING:

केजरीवाल, सिसोदियांसह २३ जण निर्दोष, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Last Updated:

दिल्ली मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदिया यांची राऊज एव्हेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. सीबीआयच्या तपासावर न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
दिल्लीतल्या बहुचर्चित मद्य घोटाळ्याच्या आरोपात आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यांच्यासोबत मनीष सिसोदिया देखील तुरुंगात होते. अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य घोटाळ्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. या घोटाळ्यामुळे ते अडचणीत आले होते आणि हातून त्यांची सत्ताही गेली होती. आता अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.
News18
News18
advertisement

अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांचीही निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता केल्यानंतर केजरीवाल यांना रडू कोसळलं. ते भावुक झाले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोर्टाने या दोन्ही नेत्यांना क्लीन चीट दिली आहे.

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगवास आणि कायदेशीर लढाई लढणाऱ्या अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.

advertisement

न्यायालयाने या दोघांसह सर्व २३ आरोपींना या प्रकरणातून मुक्त केले असून, तपासातील त्रुटींवरून सीबीआयला फटकारलं आहे. राऊज एव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी हा ऐतिहासिक निकाल देताना सीबीआयच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

न्यायालयाने म्हटले की, "सीबीआयने कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय दोन्ही नेत्यांना या प्रकरणात गोवले. आरोपपत्रात अनेक गंभीर त्रुटी असून, लावलेले आरोप कोणत्याही साक्षीदाराच्या जबाबाने सिद्ध होत नाहीत." मनीष सिसोदिया यांच्या विरोधात प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय आरोपी बनवण्यात आले, अशी टिपणी न्यायाधीशांनी केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘मायमराठी’च्या सेवेत हजर, पुणेकराचं काम पाहाल, तर सलाम कराल, Vid
सर्व पहा

माझी पीएम मोदींना विनंती आहे की या प्रकरणात लक्ष घालावं. या लोकांनी माझ्यावर खोटी केस लावली. आज कोर्टानं सांगितलं केजरीवाल इमानदार आहेत. सत्तेसाठी अशा खोट्या केस लावल्या, खोटे आरोप केले. केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले.

मराठी बातम्या/देश/
केजरीवाल, सिसोदियांसह २३ जण निर्दोष, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल