TRENDING:

आत्याची भाचीवर वाईट नजर, घरातच केली नको ती डिमांड, नकार मिळताच थरकाप उडवणारं कृत्य!

Last Updated:

समलैंगिक संबंधाला विरोध केल्यामुळे आत्याने भाचीची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
समलैंगिक संबंधाला विरोध केल्यामुळे आत्याने भाचीची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची संशयास्पद परिस्थितीमध्ये गळा दाबून हत्या करण्यात आली. या मुलीची हत्या तिची आत्या काजलने केल्याचा आरोप कुटुंबाने केला, त्यानंतर पोलिसांनी काजलवर गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
आत्याची भाचीवर वाईट नजर, घरातच केली नको ती डिमांड, नकार मिळताच थरकाप उडवणारं कृत्य! (AI Image)
आत्याची भाचीवर वाईट नजर, घरातच केली नको ती डिमांड, नकार मिळताच थरकाप उडवणारं कृत्य! (AI Image)
advertisement

काजलने तिच्या 16 वर्षांच्या भाचीची रुद्राक्षाच्या माळेने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. अल्पवयीन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.

मुलीचं कुटुंब आणि ग्रामस्थांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी काजल ही मुलासारखी राहते, तसंच ती समलिंगी आहे. काजलने याआधीही गावातील अनेक महिलांवर तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

advertisement

दुसरीकडे मृत मुलीच्या कुटुंबानेही काजलवर असेच आरोप केले आहेत. काजल मुलीवर समलिंगी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होती, पण मुलीने नकार दिल्यामुळे तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली, असं कुटुंबाचं म्हणणं आहे. बिहारच्या मुंगेरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ पसरली आहे.

काजलला अटक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि कांद्याच्या दरात पुन्हा घट, कपाशीला किती मिळाला भाव?
सर्व पहा

'मृतदेह संशयास्पद स्थितीमध्ये आढळला. प्रथमदर्शनी गळा दाबून हत्या केल्याचं दिसून येत आहे. याप्रकरणी जलदगतीने कारवाई करत आरोपी काजलला अटक करण्यात आली आहे. कुटुंब आणि ग्रामस्थांच्या दाव्यांचा सखोल तपास केला जात आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल', असं डीएसपी अभिषेक आनंद म्हणाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/देश/
आत्याची भाचीवर वाईट नजर, घरातच केली नको ती डिमांड, नकार मिळताच थरकाप उडवणारं कृत्य!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल