‘एक्सिस माय इंडिया’ या एजन्सीने आपला एक्झिट पोल सगळ्यात उशिरा जाहीर केला. एक्सिस माय इंडियाने बिहारची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे भाकित वर्तवले आहे. एनडीए आणि महाआघाडीमध्ये अवघ्या काही टक्के मतांचा फरक राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापनेचा अंदाज आहे. या एक्झिट पोलमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए २४३ पैकी १२१ ते १४१ जागा जिंकेल, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला ९८ ते ११८ जागा मिळतील असा अंदाज आहे.
advertisement
या एक्झिट पोलमध्ये प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाला जास्तीत जास्त दोन जागा मिळतील असा अंदाज आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षालाही जास्तीत जास्त दोन जागा मिळतील असा अंदाज आहे.
राष्ट्रीय जनता दल मोठा पक्ष...
६७ ते ७६ जागांसह आरजेडी सर्वात मोठा पक्ष बनू शकतो. जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहू शकते. अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये मतांच्या बाबतीत एनडीए पुढे असल्याचे दिसून आले आहे. एनडीए ४३%, महाआघाडी ४१%, इतरांना १२% आणि जन सूरज ४% जिंकण्याचा अंदाज आहे. तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. नितीश कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वेमध्ये मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून आले.
कोणाला किती जागा मिळण्याचा अंदाज?
राजद: ६७-७६ जागा
जेडीयू: ५६-६२ जागा
भाजप: ५०-५६ जागा
काँग्रेस: १७-२१ जागा
इतर: ११-१६ जागा
