TRENDING:

Bihar Election SIR Impact : SIR चा प्रभाव असलेल्या जागांनी बदललं सत्तेचं समीकरण? विरोधकांची झोप उडवणारी आकडेवारी समोर

Last Updated:

SIR Imapact Bihar Election : विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षणावरून (Special Intensive Revision- SIR) राजकीय वाद निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या या मोहिमेमुळे बिहारच्या सत्ताकारणाच्या आकडेवारीवर मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पाटणा: केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारमध्ये राबवलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षणावरून (Special Intensive Revision- SIR) राजकीय वाद निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या या मोहिमेमुळे बिहारच्या सत्ताकारणाच्या आकडेवारीवर मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
SIR चा प्रभाव असलेल्या जागांनी बदललं सत्तेचं समीकरण? विरोधकांची झोप उडवणारी आकडेवारी समोर
SIR चा प्रभाव असलेल्या जागांनी बदललं सत्तेचं समीकरण? विरोधकांची झोप उडवणारी आकडेवारी समोर
advertisement

SIR अंतर्गत बिहारमध्ये अंदाजे ४७ लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्याशिवाय, ड्राफ्ट निवडणूक यादीत ६५ लाख हून अधिक मतदारांची नावे नव्हती. यातील काही मृत, स्थलांतरित किंवा दुहेरी नोंदीधारक होते. काही भागात मतदार वगळण्याचे प्रमाण ७.७% पर्यंत देखील नोंदले गेले आहे, विशेषतः मुस्लिम अल्पसंख्याकांचे भाग असलेल्या सीमांचल भागात मतदार वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असलेल्या मतदारांना वगळण्यात येईल असा आक्षेप विरोधी पक्षांनी घेतला होता. तर, कोणत्याही पात्र मतदाराचा अधिकार हिरावला जाणार नसल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला होता. काहीशा वादग्रस्त ठरलेल्या एसआयआर प्रक्रियेचा परिणाम निवडणूक निकालावर झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

advertisement

>> एसआयआर प्रभावी ठरललेल्या जागांचे चित्र काय?

एसआयआरमध्ये दुबार मतदार, मृत्यू झालेले आणि बोगस मतदार हटवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, ऐन मतदानाच्या दिवशी अनेक पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याची तक्रार केली होती. त्यामुळे एसआयआरच्या प्रक्रियेवर शंका निर्माण झाली होती. एसआयआरचा मोठा प्रभाव पडलेल्या १०६ जागांचे निवडणूक कल समोर आले आहेत. बहुतांशी मतदारसंघात उमेदवारांना निर्णायक आघाडी मिळाली आहे. बिहारमधील १०६ जागांवर एसआयआर प्रक्रियेचा मोठा परिणाम होणार झाला.

advertisement

बिहारमध्ये १०६ जागांवर एसआयआर जाहीर करण्यात आले होते. या जागांवर सत्ताधारी एनडीएने क्लीन स्वीप केले आहे. एनडीएला ८८ जागांवर विजय मिळाला. यामध्ये भाजपने सर्वाधिक ४० जागांवर विजय, आघाडी मिळवली. तर, जनता दल यूनायटेडने ३८ जागांवर विजय, आघाडी मिळवली. तर राष्ट्रीय लोकमोर्चाला एक आणि लोकजनशक्ती पक्षलाा ९ जागा मिळाल्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Winter Diet: हिवाळ्यात काय खावं अन् काय नको? उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला
सर्व पहा

एसआयआर झालेल्या जागांवर मोठा फटका हा महाआघाडीला बसला. मागील निवडणुकीच्या तुलनेत ३१ जागांचा फटका महाआघाडीला बसला. राष्ट्रीय जनता दलाला १२ जागा, काँग्रेस, भाकप-माले, माकप यांना प्रत्येकी एका जागेवर विजय, आघाडी मिळाली. एनडीएला तब्बल ३३ जागांचा फायदा झाला.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Bihar Election SIR Impact : SIR चा प्रभाव असलेल्या जागांनी बदललं सत्तेचं समीकरण? विरोधकांची झोप उडवणारी आकडेवारी समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल