TRENDING:

डाव्यांच्या गडात सुरुंग लावणाऱ्या Raid श्रीलेखा, गुंडही थरथर कापतात, कोण आहेत भाजपचा नवा चेहरा माजी IPS?

Last Updated:

केरळच्या राजधानीतील राजकारणात मोठा उलटफेर घडवत तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तिरुवनंतपुरम : केरळच्या पोलीस दलात आर. श्रीलेखा हे नाव फर्स्ट लेडी म्हणून ओळखलं जातं. 1987 मध्ये केरळमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी बनण्यापासून ते 2017 मध्ये राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी (पोलीस महासंचालक) पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. 33 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या प्रभावी आणि निर्भीड कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
News18
News18
advertisement

'रेड श्रीलेखा'

1987 बॅचच्या केरळ केडरच्या या महिला अधिकाऱ्याने आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असताना त्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागामध्ये (CBI) अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यांच्या याच धाडसी आणि कडक स्वभावामुळे त्यांना 'रेड श्रीलेखा' हे टोपणनाव मिळालं होतं, जे आजही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. याव्यतिरिक्त, वाहतूक आयुक्त म्हणूनही त्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्याचं श्रेयही त्यांना दिलं जातं.

advertisement

निवृत्तीनंतर भाजपात प्रवेश

डिसेंबर 2020 मध्ये 33 वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर आर श्रीलेखा निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर एक वर्षाच्या आतच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) प्रवेश केला. आता त्या केरळात पुन्हा एकदा इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहेत. कारण केरळ हा नेहमीच डाव्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. आता केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरमध्ये भाजपने मोठं यश मिळवलं आहे. या यशात आर श्रीलेखा यांचा महत्त्वाचा वाटा असून त्या तिरुअनंत पुरममध्ये भाजपच्या पहिल्या महिला महापौर बनू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या तिरुवनंतपुरमच्या ससथामंगलम प्रभागातून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.

advertisement

LDF सरकारसोबतचा तणाव आणि राजकीय निर्णय

श्रीलेखा यांचा भाजपमधील प्रवेश अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण त्यांच्या सेवाकाळात विशेषतः शेवटच्या टप्प्यात, त्यांचे डाव्या लोकशाही आघाडीच्या (LDF) सरकारसोबत संबंध ताणले होते. सेवेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी औपचारिकता टाळून निरोप समारंभाला हजर न राहण्याचा निर्णय घेतला होता.

भाजपचा ऐतिहासिक विजय आणि महापौरपदाची शर्यत

advertisement

केरळच्या राजकारणात मोठा विजय मिळताच श्रीलेखा यांच्या राजकीय प्रवेशाला देखील मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. केरळच्या राजधानीतील राजकारणात मोठा उलटफेर घडवत तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. गेली 45 वर्षे अभेद्य राहिलेला डाव्या लोकशाही आघाडीचा (LDF) बालेकिल्ला उद्ध्वस्त करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) या महत्त्वाच्या महानगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

advertisement

महानगरपालिकेच्या एकूण 101 प्रभागांपैकी भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून 50 जागा जिंकल्या आहेत. बहुमताचा आकडा (51) गाठण्यासाठी भाजपला केवळ एका जागेची आवश्यकता आहे. तर LDF ला 29, तर संयुक्त लोकशाही आघाडीला (UDF) 19 जागांवर समाधान मानावं लागले.

आर. श्रीलेखा महापौरपदासाठी प्रबळ दावेदार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतीची क्रांती पाहायची तर थेट इथं जायचं, पुण्यात भरलंय सर्वात मोठं कृषी प्रदर्शन
सर्व पहा

ससथामंगलम प्रभागातून विजयी झालेल्या आर. श्रीलेखा महापौरपदाच्या शर्यतीत सध्या आघाडीवर आहेत. केरळच्या पहिल्या महिला आयपीएस आणि डीजीपी म्हणून त्यांची प्रशासकीय पार्श्वभूमी, तसेच त्यांची ठाम नेतृत्वशैली, त्यांना महापौरपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार बनवते. भाजपकडून अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नसली, तरी संख्याबळ आणि त्यांच्या प्रभावामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे.

मराठी बातम्या/देश/
डाव्यांच्या गडात सुरुंग लावणाऱ्या Raid श्रीलेखा, गुंडही थरथर कापतात, कोण आहेत भाजपचा नवा चेहरा माजी IPS?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल