किसान कृषी प्रदर्शनाची सुरुवात 1992 पासून झाली असून शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील नवीन तंत्रज्ञान, आधुनिक अवजारे आणि नव्या पद्धतींची माहिती मिळावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. यावर्षीही या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे विचार थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे किसान कृषी प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
advertisement
Success Story : शेतकऱ्यानं लावलं डोकं, डाळिंबाच्या बागेत घेतलं मिरचीचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात
आधुनिक शेती तंत्रज्ञानाची एकाच ठिकाणी माहिती
कृषी प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी व्यवस्थापन, कृषी निविष्ठा, शेतीसाठीची यंत्रसामग्री, पशुधन, जैव व ऊर्जा क्षेत्र, वाटिका तसेच शेतीपूरक लघुउद्योग अशा विविध विभागांची दालने उभारण्यात आली आहेत. या दालनांमधून संबंधित क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे स्टॉल शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध यंत्रे व उपकरणांचे सादरीकरण स्वतंत्र खुल्या जागेत करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात सादर करण्यात आलेली आधुनिक कृषी अवजारे आणि शेतीसंदर्भातील नवीन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी ती Kisan.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून शेतकरी संबंधित कंपन्या व तज्ज्ञांशी थेट संपर्क साधू शकतात.





