TRENDING:

CBI Raid: डेप्युटी कमिश्नर मॅडमच्या घरी इतका पैसा सापडला की, मोजता मोजता अधिकाऱ्यांचे हात दुखू लागले, मशीन बंड पडली

Last Updated:

CBI Raid: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीबीआयने मोठी कारवाई करत झांसीतील सीजीएसटीच्या महिला डेप्युटी कमिश्नरला लाचखोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. छाप्यात रोख रक्कम, सोने-चांदी आणि मालमत्तेची कागदपत्रे सापडली की मोजणी करताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

झांसी: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीबीआयने मोठी कारवाई करत 70 लाखांची लाच घेणाऱ्या महिला आयआरएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. झांसी रेंजमध्ये कार्यरत असलेल्या सीजीएसटी (CGST) च्या डेप्युटी कमिश्नर प्रभा भंडारी यांना लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे.

advertisement

सीबीआयच्या हाती लागलेल्या एका रेकॉर्डेड फोन कॉलमध्ये प्रभा भंडारी यांनी आपल्या अधिकाऱ्यांना70 लाख रुपये सोन्यात बदलून देण्याचे’ आदेश दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या फोन कॉलचा मागोवा घेत सीबीआयने झांसी, दिल्ली आणि ग्वालियर येथे एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने-चांदी आणि सुमारे 9 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

advertisement

या प्रकरणात प्रभा भंडारी यांच्यासह दोन सुपरिटेंडंट, एक फर्म मालक आणि एक वकील यांनाही अटक करण्यात आली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे 2026 मध्ये ईडीपेक्षा सीबीआयच मोठी भूमिका बजावणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी भ्रष्टाचारविरोधात मोठा धक्का

advertisement

2026 या वर्षाची सुरुवातच भ्रष्टाचारविरोधातील धडक कारवाईने झाली असून, या घटनेने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. झांसी येथे कार्यरत असलेल्या सीजीएसटीच्या डेप्युटी कमिश्नर आणि आयआरएस अधिकारी प्रभा भंडारी यांना सीबीआयने 1.5 कोटी रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात रंगेहाथ अटक केली आहे.

advertisement

ही अटक एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे वाटावी अशी आहे; कारण एका फोन कॉलच्या रेकॉर्डिंगनेमॅडम’चे संपूर्ण काळे कारनामे उघडकीस आणले. या प्रकरणात सीबीआयने केवळ महिला अधिकाऱ्यालाच नव्हे, तर त्यांचे दोन विश्वासू सुपरिटेंडंट, एक फर्म मालक आणि मध्यस्थाची भूमिका बजावणारा एक वकील यांनाही तुरुंगात पाठवले आहे.

एका कॉलने सगळा खेळ बिघडवला

या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या जाळ्याचा पर्दाफाश एका रेकॉर्डेड फोन कॉलमुळे झाला. सीबीआय बराच काळ या सिंडिकेटवर नजर ठेवून होती. एका फर्म मालकाकडून करचुकवेगिरीचे प्रकरण मिटवून देण्याच्या बदल्यात १.५ कोटी रुपयांची लाच मागण्यात आली होती. ठरलेल्या करारानुसार, पहिल्या हप्त्यात ७० लाख रुपये देण्याचे ठरले होते. याच दरम्यान सीबीआयने सापळा रचला.

एक सुपरिटेंडंट प्रभा भंडारी यांना फोन करून म्हणाला,

मॅडम, पैसे मिळाले आहेत.’

यावर प्रभा भंडारी यांचे उत्तर धक्कादायक होते. त्यांनी सांगितले, ‘ठीक आहे, ते लगेच सोन्यात बदला आणि मग मला देऊन टाका.’

रोख रकमेपेक्षा सोने लपवणे सोपे जाईल, असा त्यांचा अंदाज होता. मात्र त्यांना कल्पनाही नव्हती की सीबीआय त्यांचा प्रत्येक शब्द रेकॉर्ड करत आहे. जशीच लाच रक्कम सोन्यात रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तशीच सीबीआयने छापा टाकत सर्वांना अटक केली.

झांसीपासून दिल्लीपर्यंत एकाचवेळी छापे

अटकेनंतर सीबीआयच्या विविध पथकांनी झांसी, दिल्ली आणि ग्वालियर येथे एकाचवेळी छापेमारी सुरू केली. या शोधमोहीमेत सापडलेले साहित्य पाहून तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.

छाप्यात लाखो रुपयांची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने, दिल्ली व इतर पॉश भागांतील कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांचे कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अनेक डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या डायऱ्यांमध्ये इतर फर्मकडून वसूल केलेल्या लाचेचा तपशील असण्याचा संशय आहे. याच कारणामुळे झांसीतील प्रभा भंडारी यांचे कार्यालय आणि निवासस्थान पूर्णपणे सील करण्यात आले आहे.

मॅडम’चे विश्वासू साथीदारही गजाआड

या संपूर्ण प्रकरणाची मुख्य सूत्रधार प्रभा भंडारी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांच्या या काळ्या साम्राज्याला चालवण्यासाठी खाली एक पूर्ण यंत्रणा कार्यरत होती.

सीबीआयने दोन सुपरिटेंडंट, जे थेट व्यापाऱ्यांशी संपर्क ठेवत आणि पैसे गोळा करत एक फर्म मालक, ज्याने लाच दिली. एक वकील, जो संपूर्ण व्यवहारात मध्यस्थ होता यांना अटक केली आहे. सर्व आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे सरकारचा ‘झिरो टॉलरन्स’चा संदेश स्पष्टपणे समोर आला आहे. 2025 च्या अखेरीस केंद्र सरकारने जाहीर केलेली भ्रष्टाचारविरोधी भूमिका आता प्रत्यक्ष कारवाईतून दिसू लागली आहे.

प्रशासनातील जाणकारांचे म्हणणे आहे की, जीएसटी विभागात भ्रष्टाचाराच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या आणि प्रभा भंडारी यांच्या अटकेमुळे इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोशल मीडियावर या कारवाईचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, अनेकजण याला 2026 मधील स्वच्छ आणि कडक सुरुवात मानत आहेत.

पुढे काय?

सीबीआय आता सर्व आरोपींना विशेष न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी करणार आहे. तपासाचा मुख्य मुद्दा आता हा आहे की, 1.5 कोटींच्या या लाचखोरीतील रक्कम वरपर्यंत कुठे-कुठे पोहोचली होती? प्रभा भंडारी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होत्या की त्या स्वतःच या रॅकेटच्या बॉस होत्या? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे करू शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळद खातीये चांगलाच भाव, शेवगा आणि डाळींबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

मराठी बातम्या/देश/
CBI Raid: डेप्युटी कमिश्नर मॅडमच्या घरी इतका पैसा सापडला की, मोजता मोजता अधिकाऱ्यांचे हात दुखू लागले, मशीन बंड पडली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल