रोव्हरने चंद्रावर उतरताच मेसेजही पाठवला असून मेड इन इंडिया, मेड फॉर द मून असा मेसेज रोव्हरने दिल्याचं इस्रोने म्हटलंय. रोव्हर शिडीवरून चंद्रावर उतरला असून चंद्रावर फिरला असल्याचंही इस्रोने अपडेट देताना सांगितले.
advertisement
advertisement
चंद्रावर लँडरने लँडिंग केल्यानंतर चार तासांनी रोव्हर प्रज्ञान बाहेर निघाला. प्रज्ञानचे स्पीड हे प्रतीसेकंद एक सेंटिमीटर इतकं आहे. यावेळी कॅमेऱ्याच्या मदतीने रोव्हर चंद्राचे फोटो टिपेल .चंद्रावरील हवामानाचीसुद्धा माहिती रोव्हर देईल. याशिवाय चंद्राच्या भूमीवर असलेल्या इयॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सच्या प्रमाणाचाही शोध रोव्हर घेईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2023 9:09 AM IST
मराठी बातम्या/देश/
Chandrayaan 3 : रोव्हर प्रज्ञानचं चंद्रावर पहिलं पाऊल, फोटो आला समोर; इस्रोने दिले अपडेट