23 ऑगस्टनंतर आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा. आज भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना. तसंच भारताच्या सौरमोहिमेचंही लाँचिंग होतं. एकिकडे सूर्ययान आदित्य एल 1 सूर्याच्या दिशेने झेपावलं. तर दुसरीकडे भारत-पाकिस्तान मॅचही सुरू झाली. त्यातच आता चंद्रावरूनही आनंदाची बातमी आली आहे. चांद्रयान 3 च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर सेंच्युरी मारली आहे. आता प्रज्ञानने सेंच्युरी मारली म्हणजे नेमकं काय केलं?
advertisement
Aditya L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचं आदित्य L1 झेपावलं; पाहा PHOTOS
तर इस्रोने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर १०० मीटर प्रवास पूर्ण केला आहे. त्याचा प्रवास अजूनही सुरू आहे. ज्यावेळी इस्रोला ही अपडेट मिळाली त्याचवेळी इंडिया-पाक मॅचही सुरू झाली. त्यामुळे हीच वेळ साधत इस्रोनेही चांद्रयानबाबत अगदी क्रिकेट शैलीत अपडेट दिली.
‘चांद्रयान-3’ च्या लँडर आणि रोव्हरला नाव कसं दिलं?
‘चांद्रयान-3’च्या लँडरचं नाव ‘विक्रम’ आणि रोव्हरचं नाव ‘प्रज्ञान’ ठेवण्यात आलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ही नावं देण्यामागील कारण काय आहे? ‘चांद्रयान-3’च्या रोव्हरला ‘प्रज्ञान’ असं नाव देण्यात आलं आहे, ज्याचा अर्थ ‘बुद्धिमता’ असा होतो. रोव्हरला हे नाव देण्यात आलं, कारण शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, चंद्राच्या पृष्ठभागावरील अनेक गोष्टींची माहिती गोळा करण्यासाठी रोव्हरला त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो.
‘चांद्रयान-3’च्या लँडरला डॉ. विक्रम साराभाई यांचं नाव देण्यात आलं आहे. विक्रम साराभाई यांना भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हटलं जातं. ‘विक्रम’ या शब्दाचा अर्थ धैर्य आणि शौर्याशी जोडलेला आहे.
23 ऑगस्टला चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालं. यानंतर चंद्रावर लँड करणारा भारत जगातील चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे.
