Chandrayaan 3 : मसाला डोसामुळे यशस्वी झालं चांद्रयान 3; ISRO ने सांगितली Moon Mission ची Inside Story
- Published by:Priya Lad
Last Updated:
भारताच्या चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेत साऊथ इंडियन डिश मसाला डोसाचाही मोलाचा वाटा आहे, असं इस्रोने सांगितलं आहे.
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक दिवस मानला जातो. चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून भारताने मोठा विजय मिळवला. चंद्राच्या या भागावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं जातं आहे. पण इस्रोने मात्र चांद्रयानच्या यशाचं श्रेय चक्क मसाला डोसालाही दिलं आहे.
मसाला डोसा एक साऊथ इंडियन डिश. देशभरातील अनेक लोक हा पदार्थ आवडीने खातात आणि याच पदार्थामुळे चांद्रयान 3 च्या मोहिमेलाही बळ मिळालं. भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशात मसाला डोसाचाही मोलाचा वाटा असल्याचं इस्रोने सांगितलं आहे. आता चांद्रयानशी मसाला डोसाचं काय आणि कसं कनेक्शन, असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चांद्रयान आणि मसाला डोसाचा हा संबंध काय आणि कसा ते आता सविस्तर पाहुयात.
advertisement
पत्रकार बरखा दत्त यांनी द वॉशिंग्टन पोस्टच्या एका अभिप्रायात इस्रोच्या टीमने काय काय केलं ते सांगितलं. "आम्ही दररोज संध्याकाळी 5 वाजता मोफत मसाला डोसा आणि फिल्टर कॉफी देऊन ही मोहीम क्रॅक केली, असं मिशन शास्त्रज्ञ व्यंकटेश्वर शर्मा यांनी सांगितल्याचं त्या म्हणाल्या.
advertisement
याचा परिणाम म्हणजे सर्वांना प्रोत्साहन मिळालं. प्रत्येक जण स्वतःचे जास्त तास देऊ लागले. अधिक तास काम करण्यास सर्वजण प्रवृत्त झाले. अचानक प्रत्येक जण अधिक कालावधी काम करण्यात आनंद मानू लागला, असं ते म्हणाले. जेव्हा काळ कठीण होता आणि चांद्रयान-3 ला अशक्यही साध्य करण्याच्या सामना करावा लागत होता, तेव्हा कोणतंही आर्थिक प्रोत्साहन नव्हते. त्यावेळी मसाला डोसा बचावासाठी आल्याचं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं.
advertisement
चांद्रयान-3 ही इस्रोची तिसरी चंद्र शोध मोहीम ठरली. 2019 मधील चांद्रयान-2 मोहिमेचे सातत्य म्हणून हे मिशन काम करतं. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि फिरण्याची संपूर्ण क्षमता प्रदर्शित करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. चांद्रयान-3 चं बजेट 615 कोटी रुपये होतं. त्या तुलनेत चांद्रयान-2 मोहिमेचा एकूण खर्च 978 कोटी रुपये होता.
Location :
Delhi
First Published :
Sep 01, 2023 8:21 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Chandrayaan 3 : मसाला डोसामुळे यशस्वी झालं चांद्रयान 3; ISRO ने सांगितली Moon Mission ची Inside Story






