TRENDING:

Congress On Amit Shah : राज्यसभेत भाषणात अमित शाहांकडून आंबेडकरांचा अपमान? काँग्रेसने केली माफीची मागणी

Last Updated:

Amit Shah : संसदेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली :  संसदेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शाह यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी काँग्रेस आणि विरोधकांनी केली. राज्यसभेत झालेल्या संविधानावरील दोन दिवसीय चर्चेच्या समारोपात शाह यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावेळी शाह यांनी आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन झाली असल्याचे म्हटले.
संसदेतील भाषणात अमित शाहांकडून आंबेडकरांचा अपमान? काँग्रेसने केली माफीची मागणी
संसदेतील भाषणात अमित शाहांकडून आंबेडकरांचा अपमान? काँग्रेसने केली माफीची मागणी
advertisement

राज्यसभेत बोलताना अमित शाह काँग्रेसवर विविध मुद्यांवर हल्लाबोल केला. याच दरम्यान, शाह यांनी म्हटले की, आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे. सगळीकडे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर म्हणायचे. "त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर स्वर्गात जागा मिळाली असती," असे शाह यांनी सांगितले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधकांनी या वक्तव्यावर शहा यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी म्हटले की, 'जे मनुस्मृतीवर विश्वास ठेवतात ते निश्चितपणे आंबेडकरांशी मतभेद असतील.

advertisement

तर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, अमित शाह यांनी राज्यसभेत बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य हे तिरंगाच्या विरोधात होते. त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्रचा विरोध केला. संघ परिवाराच्या लोकांना भारतीय संविधानाऐवजी मनू स्मृती लागू करायची होती असा आरोपही खर्गे यांनी केला. माझ्यासारख्या करोडो लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकर हे देवापेक्षा कमी नाहीत. दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि गरिबांसाठी देवासारखे आहे.

advertisement

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील शाहांवर टीका केली. संविधानाच्या शिल्पकाराबद्दल अशी घृणास्पद विचारसरणी भाजप आणि आरएसएसच्या शाळेतून वाढली असल्याची टीका त्यांनी केली.

मराठी बातम्या/देश/
Congress On Amit Shah : राज्यसभेत भाषणात अमित शाहांकडून आंबेडकरांचा अपमान? काँग्रेसने केली माफीची मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल