काँग्रेसने संदीप दीक्षित यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात 'आप'चे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने केजरीवालांविरोधात संदीप दीक्षित यांना तिकीट दिले आहे. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून संदीप दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवतात, त्यामुळे यावेळी निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे. भाजपने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहे, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारीही सुरू झाली आहे.
advertisement
Location :
New Delhi,Delhi
First Published :
December 12, 2024 10:25 PM IST
मराठी बातम्या/देश/
Delhi Elections : एकजूट दूर राहिली, आता थेट लढाई, दिल्लीत केजरीवालांविरोधात काँग्रेसचा तगडा उमेदवार