संसद भवन परिसर हा अतिशय संवेदनशील मानला जातो. याच परिसरात आगाची घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणांची प्रचंड धावपळ उडाली. लाग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. इमारतीतून काही लोकांना बाहेर काढताना पोलीस दिसून येत आहेत. अनेक व्यक्ती भेदरलेल्या अवस्थेत इमारतीच्या बाहेर उभ्या आहेत. दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांना कळविण्यात आले. अग्निशमन विभागाला कॉल करूनही त्यांनी यायला उशीर केल्याचा आरोप इमारतीमधील लोकांनी केला आहे. अग्निशमन दलाचे जवान जर वेळेत आले असते तर कमी नुकसान झाले असते, असे इमारतीमधील रहिवासी म्हणाले.
advertisement
Location :
Delhi
First Published :
October 18, 2025 2:43 PM IST