घटना कॅमेऱ्यात कैद
सोशल मीडियावरून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लाल किल्ल्याजवळ काहीजण व्हिडीओ शूट करत होते. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेत होता. त्याचवेळी लाल किल्ल्याजवळ एका मोठा स्फोट झाला. आगीचे उंचउंच डोंब दिसून आले. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर लोकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं पहायला मिळालं आहे.
advertisement
पाहा Video
अमित शहा काय म्हणाले?
दिल्लीतील स्फोटात झालेल्या जीवितहानीमुळे शब्दांतून व्यक्त करता येणार नाही असे दुःख आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझी तीव्र संवेदना आहे. स्फोटस्थळाला भेट दिली आहे आणि रुग्णालयात जखमींनाही भेटलो आहे. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.
सर्व शक्यता तपासून पाहत आहोत - अमित शहा
वरिष्ठ संस्था या घटनेची पूर्ण तीव्रतेने चौकशी करत आहेत आणि या घटनेचा सखोल अभ्यास करतील. चौकशीचे आदेश: आसपासच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे (CCTV Footage) फुटेज आणि इतर संबंधित वस्तूंची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तपास पथक: दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखेचे प्रमुख (Special Branch Chief) स्वतः घटनास्थळी आहेत आणि ते सर्व शक्यता तपासून पाहत आहेत.
PM मोदी काय म्हणाले?
आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला.
