TRENDING:

दोन्ही पायांनी दिव्यांग पण तरीही हजारो लोकांचा वाचवला जीव, तरुणीच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट

Last Updated:

निर्मला कुमारी ही दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. असे असताना तिने आपला जीव धोक्यात घालून हजारो लोकांचा जीव वाचवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल कुमार, प्रतिनिधी
निर्मला कुमारी
निर्मला कुमारी
advertisement

छपरा : जर मनात जिद्द असेल तर कोणतेही ध्येय, कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी कितीही समस्या आल्या तरी यश नक्कीच मिळते. एका दिव्यांग मुलीने हे सिद्ध करुन दाखवले आहे. दोन्ही पायांनी दिव्यांग असेलल्या निर्मला कुमारीची ही प्रेरणादायी गोष्ट आहे.

निर्मला कुमारी ही दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. ती बिहारच्या छपरा शहरातील भगवान बाजार परिसरातील रहिवासी आहे. निर्मला कुमारी हिने आपला जीव धोक्यात घालून हजारो लोकांचा जीव वाचवला आहे. कोरोनाच्या काळात लोकं घाबरुन घरात होते, त्यावेळी ती आपल्या घरापासून 20 किलोमीटर दूर गावात जाऊन लोकांची कोरोना तपासणी करत होती.

advertisement

कुटुंबीयांनी दिला होता नकार -

निर्मला कुमारीला तिच्या कुटुंबीयांनी ड्यूटी केंद्रापर्यंत पोहोचवायला नकार दिला होता. मात्र, तिने आपल्या कुटुंबीयांना समजावले आणि केंद्रापर्यंत पोहोचवण्यास सांगितले. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला केंद्रापर्यंत पोहोचवले. यानंतर तिने निश्चय केला की काहीही झाले तरी मी लोकांना अशाप्रकारे तडफडत मरताना पाहू शकत नाही.

पत्नीसोबत जाणार होते अमेरिकेला, व्हिसासाठी आलेे मुंबईत, पण घाटकोपर दुर्घटनेनं घेतला मोठ्या अधिकाऱ्याचा जीव, हादरवणारी घटना

advertisement

निर्मला ही दोन्ही पायांनी दिव्यांग आहे, तरीही तिने कोरोनाच्या या महासंकटात तपास करण्याची जबाबदारी स्विकारली आणि इतकेच नव्हे तर तपासणीदरम्यान, हजारो लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच वेळेवर त्यांच्यावर उपचार करुन त्यांचा जीव वाचवला.

निर्मला हिची इच्छाशक्ती आणि जिद्द पाहून इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. मात्र, एक दिवस असा आला ज्यावेळी निर्मला हिलाही कोरोनाची लागण झाली. मात्र, तरीही तिने हिंमत हारली नाही. 2 महिने ती कोरोनासोबत लढत राहिली आणि तिने शेवटी तिने कोरोनाच्या महासंकटाला पराभूत केलं.

advertisement

मोबाईल चोरी झाल्यावर सर्वात आधी नेमकं काय करावं? पर्सनल डेटा अन् पैसेही राहतील सुरक्षित

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी खर्चात होईल जास्त कमाई, हिवाळ्यात घ्या ही भाजीपाला पिके, Video
सर्व पहा

यानंतर नर्स असलेली निर्मला ही पुन्हा लोकांची सेवा करण्यासाठी मैदानात उतरली. लोकल18 शी बोलताना तिने सांगितले की, सुरुवातीपासूनच मला आरोग्याच्या क्षेत्रात सेवा करण्याची इच्छा होती. या स्वप्नाला मी माझ्या मेहनत आणि जिद्दीने साकार केले. मला जिथेही सेवा करण्यासाठी पाठवले जाते, तिथे मी निस्वार्थ भावाने सेवा करते. मी मुलांच्या लसीकरणासाठी मुख्यालयापासून 35 ते 40 किमी अंतरावर जाऊ मुलांना लस दिली आहे. 2015 पासून सुरू केलेले कार्य मी आजपर्यंत नि:स्वार्थ भावनेने केले असल्याचे तिने सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/देश/
दोन्ही पायांनी दिव्यांग पण तरीही हजारो लोकांचा वाचवला जीव, तरुणीच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल