मोबाईल चोरी झाल्यावर सर्वात आधी नेमकं काय करावं? पर्सनल डेटा अन् पैसेही राहतील सुरक्षित

Last Updated:

जर तुमचा मोबाईल चोरी झाला असेल तर अनेक पर्याय आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईलमधील डाटा सुरक्षित करू शकतात. यामुळे तुमचा बँक बॅलन्स आणि तुमची गुप्त माहितीचा कुणीही गैरवापर करू शकणार नाही.

फाईल फोटो
फाईल फोटो
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : मोबाईल चोरीच्याही अनेक घटना समोर येत असतात. यामध्ये मोबाईल चोरी झाल्यावर मोबाईल अनलॉक करुन यूपीआयच्या माध्यमातून संबंधितांच्या अकाऊंटमधील पैसे ट्रान्सफर केल्याचीही एक घटना समोर आली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत लोकल18 च्या टीमने सायबर एक्सपर्ट यांच्याशी संवाद साधला.
झारखंडच्या रांची येथील सायबर पीस कंपनीचे मालक आणि सायबर एक्सपर्ट विनीत यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जर तुमचा मोबाईल चोरी झाला असेल तर अनेक पर्याय आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईलमधील डाटा सुरक्षित करू शकतात. यामुळे तुमचा बँक बॅलन्स आणि तुमची गुप्त माहितीचा कुणीही गैरवापर करू शकणार नाही.
advertisement
अशाप्रकारे आपल्या मोबाईलला ठेवा सुरक्षित -
साइबर एक्सपर्ट विनीत यांनी सांगितले की, सर्वात आधी जर तुमचे ई-वॉलेट किंवा मनी अ‍ॅप वापरत असाल तर त्याचा सिक्युरिटी पासवर्ड अनेबल करुन टाका. अनेकदा तर लोक सिक्युरिटी पासवर्ड विना अ‍ॅपचा वापर करतात. हे खूप धोकादायक आहे. तसेच पासवर्ड हा 1234 नव्हे तर थोडा मोठा आणि स्ट्राँग ठेवावा.
advertisement
वजन कमी होणार, मानसिक तणाव गायब होणार, फक्त आजपासून लावा ही सवय, अन् मग पहा फायदा
फोन चोरी झाल्यानंतर सर्वात आधी बँक अथॉरिटीला याबाबतची माहिती द्यावी. तसेच ज्यांच्याशी तुमचा नेहमी संपर्क ठेवतो असा ऑफिशिअल बँक नंबर आपल्या फोनमध्ये नेहमी ठेवावा. ते लोक तुमच्या अकाऊंटला त्वरित ब्लॉक करतील. यामुळे तुमचे खात्यातील पैसे ट्रान्सफर होऊ शकणार नाही.
advertisement
याशिवाय अ‍ॅपल आणि अँड्रॉईड असेल तर फाइंड माय फोन नावाचे एक फीचर येते. या माध्यमातून तुम्ही तुमचा फोन ट्रॅक करू शकतात. ट्रॅकच नव्हे तर त्यामधील सेंसेटिव्ह डाटाही डिलिट करू शकतात.
मोबाईल ब्लॉकही करू शकतात -
तसेच जर हे शक्य होत नसेल तर त्वरीत तुम्ही ceir.gov.in या सरकारी वेबसाईटवर जाऊन त्वरीत तुमचा फोन स्वत: ब्लॉक करू शकतात. यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारही दाखल करू शकतात. तसेच त्या तक्रारीची एक कॉपी घेऊन तुमच्या सर्व्हिस प्रोवायडरच्या ऑफिसमध्ये जावे. याठिकाणाहूनही तुम्ही तुमचा फोन अगदी सोप्या पद्धतीने ट्रॅक करू शकतात आणि तुमचा डाटाही सुरक्षित राहील, अशी माहिती त्यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
मोबाईल चोरी झाल्यावर सर्वात आधी नेमकं काय करावं? पर्सनल डेटा अन् पैसेही राहतील सुरक्षित
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement