वजन कमी होणार, मानसिक तणाव गायब होणार, फक्त आजपासून लावा ही सवय, अन् मग पहा फायदा

Last Updated:

डॉ. राजेश पाठक यांनी सांगितले की, रात्री लवकर जेवण करणे एक चांगली सवय आहे. यामुळे आपण मानसिक आणि शारीरिक पद्धतीने पूर्णपणे आरोग्यदायी राहू शकतो.

प्रतिकात्मक फोट
प्रतिकात्मक फोट
कैलाश कुमार, प्रतिनिधी
बोकारो : सध्याची व्यस्त जीवनशैलीमुळे रात्री उशिरा जेवण करण्याची सवय अनेकांसाठी समस्या बनली आहे. यामुळे लोकांना मानसिक आणि शारिरीक दोन्ही स्तरावर समस्येचा सामना करावा लागत आहे. याबाबत ज्येष्ठ आयुर्वेदिक डॉ. राजेश पाठक यांनी माहिती दिली.
बोकारो येथील डॉ. राजेश पाठक यांनी यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स अँड रिसर्च नवी दिल्ली येथून एमडीचे शिक्षण घेतले आहे. तसेच 16 वर्षे पतंजली आणि मागील 3 वर्षांपासून सुधि आयुर्वेदा चास माध्यमातून आपली सेवा देत आहेत. डॉ. राजेश पाठक यांनी सांगितले की, रात्री लवकर जेवण करणे एक चांगली सवय आहे. यामुळे आपण मानसिक आणि शारीरिक पद्धतीने पूर्णपणे आरोग्यदायी राहू शकतो.
advertisement
रात्री लवकर जेवण करण्याचे फायदे -
1. पाचन शक्तीमध्ये सुधारणा : रात्री लवकर जेवण केल्याने पचनशक्तीमध्ये सुधारणा होते आणि शरीरात पचनक्रिया चांगली होते. यामुळे अन्न चांगले पचते. तसेच रात्री उशिरा जेवण केल्याने पोटात अपचनाची समस्या आणि जडपणा वाटतो.
हार्ट अटॅकचा धोका या फळामुळे नक्की कमी होणार, कसं खाल? Expert ने दिली महत्त्वाची माहिती
2. भरपूर झोप : रात्री 7 वाजेवाजेच्या आधी जेवण केल्याने योग्य प्रमाणात झोप होते. कारण आपल्या शरीराला 6 तासांची झोप आवश्यक असते. त्यामुळे रात्री उशिरा झोपल्याने शरीराच्या इतर अंगांना पुरेसा आराम मिळत नाही. यामुळे सकाळी सकाळी शारीरिक त्रास होऊ शकतो. अशावेळी 7 पर्यंत जेवण केल्याने तुम्हाला गाढ झोप येते आणि शरीराला पुरेसा आराम मिळतो.
advertisement
3. वजन कमी करण्यास होते मदत : रात्री लवकर जेवण केल्याने वजन संतुलित राहते. कारण रात्री शारीरिक क्रिया संथ होतात. यामुळे पोटात अन्न चांगल्याप्रकारे पचवण्यासाठी आणि वजन नियंत्रित करण्यासाठी मदत होते. तसेच रात्री अनावश्यक खाल्ल्याने शरीरात कॅलरी वाढतात.
बारावीत 99 टक्के, मग MBBS, आता बनला भारतीय सैन्यदलाची शान, तरुणाची प्रेरणादायी गोष्ट
4. मानसिक आरोग्य : रात्री लवकर जेवण केल्याने आपले मानसिक आरोग्य सुधारते. कारण लवकर जेवण केल्याने पोट साफ राहते आणि जेवणही चांगल्याप्रकारेच पचते. यामुळे मन शांत आणि स्थिर राहते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होतात आणि व्यक्तीचा मानसिक संतुलन चांगले राहते.
advertisement
5. हृदय राहते निरोगी : रात्री उशिरा जेवल्याने शरीरातील रक्तदाबावर परिणाम होतो. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. म्हणून रात्री लवकर जेवण केल्याने हृदयाशी संबंधित समस्यांपासून बचाव होतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
सूचना - ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही निर्णय घेण्यापूर्वी आरोग्यज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
वजन कमी होणार, मानसिक तणाव गायब होणार, फक्त आजपासून लावा ही सवय, अन् मग पहा फायदा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement