सिरमौर: गेल्या चार ते पाच दिवसांपासून एका चेकची चर्चा संपूर्ण देशभरत होत आहे. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट आली आहे. शिक्षण विभागाच्या चेकवर झालेल्या इंग्रजी स्पेलिंगच्या विचित्र चुका चर्चेचा झाला होता. या प्रकरणी आता सिरमौर जिल्ह्यातील रोनहाट शाळेतील ड्रॉईंग शिक्षक (DM) अत्तर सिंह यांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. शनिवारी सिरमौरचे उपसंचालक (Deputy Director) यांनी ही कारवाई केली. शाळेचे मुख्याध्यापक यांच्याविरोधातही कारवाईचा विचार सुरू आहे.
advertisement
हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाला देशभरात मोठ्या प्रमाणात कटकटीला सामोरे जावे लागले होते. चेकची घटना २५ सप्टेंबरची आहे. हा चेक मिड-डे मील इंचार्ज आणि ड्रॉईंग मास्टर अत्तर सिंह यांच्या नावाने 7,616 रुपयांसाठी जारी करण्यात आला होता. मात्र हा चेक रकमेच्या देयकासाठी नव्हे, तर त्यावरील इंग्रजी स्पेलिंगमधील धक्कादायक चुका यामुळे चर्चेत आला.
काय आहे प्रकरण?
अत्तर सिंह यांच्या नावावर 7,616 रुपयांचा चेक काढण्यात आला होता. आकड्यांमध्ये रक्कम योग्यरीत्या लिहिलेली असली तरी इंग्रजी शब्दांमध्ये लिहिताना एक नव्हे, तर अनेक चुका करण्यात आल्या होत्या.
7,616 ही रक्कम इंग्रजीत “Seven Thousand Six Hundred and Sixteen” अशी लिहिली जायला हवी होती. पण चेकवर “Saven Thursday Six Harendra Sixty” असे लिहिलेले होते!
‘Seven’ पासून ‘Hundred’ पर्यंत प्रत्येक शब्दाचा स्पेलिंग चुकीचा होता, तसेच ‘Sixteen’ च्या जागी ‘Sixty’ लिहिले होते. म्हणजेच हा चेक मराठीत वाचायचा तर “सवेन थर्सडे सिक्स हरेन्द्र सिक्सटी” असा उच्चार होईल — ज्यावरून सगळ्यांनी खिल्ली उडवली.
या चेकवर शाळेच्या मुख्याध्यापकांचे स्वाक्षरी आणि शिक्का देखील होता. त्यामुळे प्रश्न अधिक गंभीर झाले. ही घटना समोर आल्यानंतर शिक्षण विभागाची मोठी फजिती झाली आणि सोशल मीडियावर या चेकचा फोटो व्हायरल झाला.
शिक्षा विभागाची तत्काळ कारवाई
या प्रकरणानंतर शिक्षण विभागाने तत्काळ चौकशी केली. चौकशीत प्राथमिक जबाबदारी ड्रॉईंग मास्टर अत्तर सिंह यांच्यावर निश्चित करण्यात आली आणि त्यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधातही कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.