राहुल गांधी यांनी वायनाडमधून २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यांना तेव्हा अमेठीत पराभवाचा धक्का बसला होता. तर आता २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीत जिंकून आले. त्यांना वायनाड ऐवजी रायबरेलीचा खासदार होण्याचा पर्याय निवडला.
राहुल गांधी यांनी वायनाडची खासदारकी सोडल्यामुळे ही जागा रिक्त झालीय. या जागी प्रियांका गांधी मैदानात उतरणार आहेत. वायनाड हा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ असून तिथं मुस्लीम मतदार असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. २००८ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना केल्यानंतर वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला. या निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेसनेच बाजी मारलीय.
advertisement
प्रियांका गांधी गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रीय आहेत. पण त्यांनी कोणतीही निवडणूक मात्र लढवलेली नाही. पहिलीच निवडणूक त्या वायनाडमधून लढणार आहेत. वायनाड हा केरळमधला जिल्हा असून यात मल्लप्पुरम आणि कोझीकोड जिल्ह्यातील काही भाग आहे. वायनाड जवळपास ५० टक्के हिंदू तर २१ टक्के ख्रिश्चन आणि २९ टक्के मुस्लिम आहेत. पण वायनाड मतदारसंघाबाबत बोलायचं तर ४८ टक्के मुस्लिम मतदार आणि ४१ टक्के हिंदू मतदार आहेत.