कसा झाला अपघात?
रेल्वे रुळ ट्रॅक्टर चालकाने घाईघाईत ओलांडण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचा फटका त्याला बसला, ट्रॅक्टर ट्रॅकच्या मधोमध पोहोचला असतानाच, समोरून भरधाव वेगाने ट्रेन येत असल्याचे पाहून ट्रॅक्टरचा चालक घाबरला. त्याने तात्काळ ट्रॅक्टर-ट्रॉली तिथेच सोडून स्वतः उडी मारून पळ काढला. ट्रॅकवर अचानक ट्रॅक्टर-ट्रॉली उभी असल्याचे पाहून ट्रेनच्या लोको पायलट यांनी तातडीने ट्रेनचा वेग कमी केला. मात्र, वेग कमी करूनही ट्रेनची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक बसली.
advertisement
प्रवाशांचा जीव धोक्यात
या धडकेनंतर मोठा धमाक्यासारखा आवाज झाला आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. हे तुकडे उंच हवेत उडाले आणि खाली कोसळले. अपघाताचा हा थरार प्रवाशांनी डोळ्याने पाहिला. ट्रेनचा वेग कमी केल्यामुळे ती रुळावरून खाली उतरण्यापासून वाचली, पण जोरदार आवाजामुळे ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी घाबरले आणि त्यांनी लगेच ट्रेनमधून बाहेर धाव घेतली. ही संपूर्ण घटना थरारक होती.
व्हिडीओ
पोलिसांकडून कारवाई
अपघाताची माहिती तात्काळ रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. काही वेळातच जवळच्या स्टेशनवरून जीआरपी (GRP) पोलीस आणि रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तुटलेली ट्रॅक्टर-ट्रॉली ट्रॅकवरून बाजूला केली. या अपघातामुळे सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. सध्या जीआरपी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
कुठे घडली घटना?
ही धक्कादायक घटना राजस्थानच्या बीकानेरमध्ये घडली. रविवारी दिल्लीहून बीकानेरला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसला ट्रॅक्टर धडकला आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. बीकानेरहून दिल्लीकडे जाणारी गाडी क्रमांक २२४७२ दिल्ली-बीकानेर सुपरफास्ट ट्रेन बेनीसर स्टेशन क्रॉस करून श्रीडूंगरगढ स्टेशनकडे जात असताना एका रेल्वे फाटकाजवळ ट्रॅक्टर-ट्रॉली ट्रॅकवर उभी होती. या ठिकाणी रेल्वे फाटकाला कोणताही गेट किंवा संरक्षक नव्हता. याच संधीचा फायदा घेऊन ट्रॅक्टर चालकाने घाईघाईत रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच घात झाला.
