या प्रकरणातील मुख्य आरोपी मौलवी आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बनावट नोटांच्या अनुषंगाने आंतरराज्यीय रॅकेट असल्याचे बोलले जाते. बनावट नोटांच्या टोळीचे कनेक्शन महाराष्ट्रापासून मध्य प्रदेशपर्यंत आहे.
मालेगावात चौकशी, मध्य प्रदेशचे कनेक्शन
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या पोलिसांनी अशरफ अन्सारीचा मुलगा झुबेर आणि त्याच्या एका साथीदाराला १० लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली. तेव्हा या रॅकेटचा पर्दाफाश झाला. अटकेनंतर चौकशीत झुबेरने तो खंडवा येथील पैठियान गावातील एका मशिदीचा मौलवी असल्याचे सांगितले.
advertisement
मदरशच्या वरच्या मजल्यावर भाड्याची खोली, बनावट नोटांची थप्पी
ही माहिती मिळताच महाराष्ट्र पोलिसांनी खांडवा पोलिसांशी संपर्क करून त्यांना अलर्ट केले. खांडवा पोलिसांच्या पथकाने तत्काळ मदरशावर छापा टाकला आणि शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी झुबेर हा मदरशाच्या वरच्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत राहत होता. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली तेव्हा बनावट चलनांचा गठ्ठा सापडला. सुरुवातीच्या मोजणीत १२ लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या, परंतु पोलिसांचा अंदाज आहे की एकूण रक्कम १६ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असू शकते. पोलिसांकडून मोजणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी झुबेर हा मूळचा बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील हरिपुरा भागातील आहे. झुबेर हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात बनावट नोटा पुरवणाऱ्या मोठ्या तस्करी नेटवर्कचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या लोकांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस झुबेर आणि त्याच्या साथीदारांची चौकशी करीत आहेत.
