ऋषी सुनक यांनी शुक्रवारी ब्रिटनमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी समुहाकडून वाढत चाललेल्या द्वेषपूर्ण गुन्हेगारी घटनांचा निषेध नोंदवला. तसंच ब्रिटन सरकार खलिस्तानी समर्थकांचा उग्रवाद रोखण्यासाठी कडक पावलं उचलली जात आहेत, असंही सांगितलं. युकेमध्ये कोणत्याही प्रकारचा उग्रवाद किंवा हिंसा स्वीकारली जाणार नाही, यासाठी आम्ही PKE खलिस्तान समर्थकांच्या निपटाऱ्यासाठी आम्ही भारतासोबत काम करत आहोत, असंही ऋषी सुनक म्हणाले.
advertisement
यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीला खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी लंडनमधल्या भारताच्या उच्चायुक्तालयावर हल्ला केला, परिसराची तोडफोड केली आणि तिरंग्याचा अपमान केला. तसंच खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी उच्चायुक्तालयातल्या कर्मचाऱ्यांनाही धमकी दिली. अशाचप्रकारचे हल्ले कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही झाले होते.
सुनक पुढे म्हणाले, 'हे योग्य नाही आणि युके हे सहन करणार नाही. वर्षाच्या सुरूवातीलाच आमच्या सरकारने खलिस्तानी समर्थकांच्या निपटाऱ्यासाठी ब्रिटनची क्षमता वाढवण्यासाठीच्या पावलांची घोषणा केली आहे.' पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनक यांच्या शनिवारी G20 परिषदेदरम्यान भेट झाली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी भारत-ब्रिटन सर्वसमावेशक धोरणात्मक भागिदारीसोबत द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीवर चर्चा केली. यामध्ये अर्थव्यवस्था, रक्षा आणि सुरक्षा, औद्योगिक आणि हरित औद्योगिक, जलवायू परिवर्तन, स्वास्थ्य या क्षेत्रांचा समावेश आहे.
