G20 THINQ च्या राष्ट्रीय फेरीमध्ये एकूण 11,741 शाळांनी सहभाग नोंदवला, यामध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांच्या पहिले ऑनलाईन बाद फेऱ्या, ऑनलाईन सेमी फायनल आणि टाय ब्रेकर असे टप्पे पार पडले. 17-18 नोव्हेंबरला मुंबईतील एनसीपीए सभागृह आणि गेटवे ऑफ इंडिया येथे या स्पर्धेची सेमी फायनल आणि फायनल खेळवण्यात आली. फायनलमध्ये विजेते ठरलेले डीएव्ही पब्लिक स्कूल गुरग्रामचा संघ आंतरराष्ट्रीय फेरीत भारताचं प्रतिनिधीत्व करेल.
advertisement
G20 THINQ च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 23 आंतरराष्ट्रीय संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेची सेमी फायनल आणि वाइल्ड कार्ड फेरी 21 नोव्हेंबरला दिल्लीच्या सुषमा स्वराज भवन येथे झाली. यातून अव्वल 8 टीमनी आंतरराष्ट्रीय फेरीमध्ये प्रवेश केला. अमिताभ कांत (शेर्पा जी 20), नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार, ,एनडब्ल्यूडब्लूएच्या अध्यक्ष कला हरी कुमार आणि कार्मिक प्रमुख व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय सेमी फायनलचं आयोजन करण्यात आलं.
तुल्यबळ अशा 23 आंतरराष्ट्रीय टीममधून निवडण्यात आलेल्या अव्वल 8 टीम आता इंडिया गेटवर आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फायनलसाठी सहभागी होतील. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, युरोपियन युनियन, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, सिंगापूर या टीम सहभागी होणार आहेत.
भारत आता 01 डिसेंबर 23 पासून ब्राझीलकडे जी 20 चे अध्यक्षपद सोपवणार आहे. G20 THINQ हा महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या मालिकेचा शेवटचा भाग असेल.
