देशात सध्या इंधनाचा तुटवडा आणि आयातीवर वाढलेला ताण पाहता, पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस वापराबाबतचे नियम अत्यंत कडक केले आहेत. आता केवळ सिलेंडरची साठवणूकच नाही, तर घरात 'डबल' कनेक्शन असणंही गुन्ह्याच्या श्रेणीत येणार आहे. नक्की काय आहेत हे नवीन नियम आणि सामान्य माणसाला याचा फटका कसा बसू शकतो? जाणून घेऊया सविस्तर.
advertisement
1. दोनपेक्षा जास्त सिलेंडर म्हणजे 'गुन्हा'; 7 वर्षांची शिक्षासरकारी नियमांनुसार, एका घरगुती ग्राहकाला जास्तीत जास्त दोन एलपीजी सिलेंडर (14.2 किलो) ठेवण्याची परवानगी आहे. जर तुम्ही अधिकृत परवानगीशिवाय 40 किलोपेक्षा जास्त एलपीजी साठवून ठेवला, तर तो 'साठेबाजी' (Hoarding) मानला जाईल.'अत्यावश्यक वस्तू कायदा 1955' च्या कलम 7 नुसार, दोषी आढळल्यास 3 महिने ते 7 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.जप्तीची कारवाई: कलम 6 ए अंतर्गत, मर्यादेपेक्षा जास्त असलेले सर्व सिलेंडर सरकार जप्त करू शकते आणि तुमचे गॅस कनेक्शन कायमचे रद्द केले जाऊ शकते.
2. PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन एकत्र? आता चालणार नाहीमार्च 2026 मध्ये पेट्रोलियम मंत्रालयाने एक मोठा बदल केला आहे. आता ज्यांच्या घरी पाईपलाईन गॅस (PNG) सुविधा आहे, त्यांना एलपीजी सिलेंडर ठेवता येणार नाही. जर तुमच्या घरात पीएनजी जोडणी असेल आणि तरीही तुम्ही एलपीजी सिलेंडर वापरत असाल, तर ते बेकायदेशीर मानले जाईल. सरकारने अशा ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन तातडीने सरेंडर करण्याचे आवाहन केले आहे. जर तुम्ही स्वतःहून कनेक्शन परत केले तर कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र, तपासणीत दोन्ही कनेक्शन आढळल्यास कायदेशीर कारवाई अटळ आहे.
3. अवैध साठवणुकीची तक्रार कुठे करायची?गॅसचा काळाबाजार किंवा अवैध साठवणूक रोखण्यासाठी सामान्य नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर सिलेंडर साठवलेले दिसले, तर तुम्ही खालील ठिकाणी तक्रार करू शकता:LPG इमर्जन्सी हेल्पलाईन: 1906 या क्रमांकावर थेट संपर्क साधा.जिल्हा अन्न आणि पुरवठा विभाग, स्थानिक पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयात लेखी तक्रार देऊ शकता.
ऊर्जा संसाधनांचा तुटवडा आणि गरिबांपर्यंत गॅस पोहोचवण्याच्या उद्देशाने सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे पीएनजी असेल तर एलपीजीचा हव्यास सोडा आणि विनाकारण सिलेंडरची साठवणूक करून कायद्याच्या कचाट्यात अडकणे टाळा.
