घरी परत येत असताना पीतम आणि रिमझिम बिलारी बस स्टँडवर उतरले आणि पुढच्या बसची वाट पाहायला लागले. तेव्हाच रिमझिमने मला भूक लागली आहे, भजी घेऊन ये, असं पीतमला सांगितलं. यानंतर पीतम समोरच्या दुकानातून गरम भजी आणायला गेला.
पीतम भजी घेऊन आला पण त्याला रिमझिम स्टँडवर दिसलीच नाही. बराच वेळ पितमने शोधलं पण त्याला रिमझिम कुठेच दिसली नाही. पितमने पत्नीबाबत आजूबाजूच्या लोकांनाही विचारलं, अखेर तो बिलारी पोलीस स्टेशनला पोहोचला आणि पत्नी हरवल्याची तक्रार दिली.
advertisement
पत्नी तिच्या माहेरच्या एका युवकासोबत गेल्याचं पीतमने पोलिसांना सांगितलं आहे. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत असून बस स्टँडवरचे सीसीटीव्ही तपासले जात आहेत. तसंच रिमझिमचं मोबाईल लोकेशनही शोधलं जात आहे, पण नवऱ्याला भजी आणायला पाठवून पळालेल्या पत्नीची घटना आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
