सिंदूर ऑपरेशन हा भारताच्या लष्करी इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय मानला जात आहे. यामध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर लक्ष्य करून अत्यंत अचूक आणि धडक कारवाई केली. यात भारतीय लष्कराच्या शौर्य, प्रशिक्षण, आणि देशसेवेच्या भावनेचे अद्वितीय दर्शन घडते.
हा व्हिडीओ पाहताना प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. जवानांची शिस्त, प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने लढण्याची तयारी, आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना यातून स्पष्ट जाणवते. व्हिडीओमध्ये मिशनच्या तयारीपासून ते अंतिम कारवाईपर्यंतच्या क्षणांची झलक दाखवण्यात आली आहे.
advertisement
भारतीय लष्कराने सिंदूर ऑपरेशनचा पहिल्यांदाच जारी केला VIDEO
भारतीय लष्कराकडून यापूर्वी अशा प्रकारचे ऑपरेशन सार्वजनिक करण्यात आले नव्हते. त्यामुळे ‘सिंदूर ऑपरेशन’चा हा व्हिडीओ केवळ एक दस्तऐवज नसून, तो प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतावतो.