आतापर्यंत भारतीय नौदलात महिला टोही विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्याची जबाबदारी सांभाळत होत्या, परंतु आस्था पुनिया या पहिल्या महिला आहेत, ज्या लढाऊ विमान उडवतील. भारतीय नौदलाने ३ जुलै २०२५ रोजी एका विशेष कार्यक्रमात ही माहिती दिली. गोवा येथील इंडियन नेव्हल एअर स्टेशनवर दुसऱ्या बेसिक हॉक कन्व्हर्जन कोर्सच्या समारोप समारंभात आस्था पुनिया यांना त्यांचे सहकारी लेफ्टनंट अतुल कुमार धुल यांच्यासोबत प्रतिष्ठित विंग्स ऑफ गोल्डने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांना रिअर ॲडमिरल जनक बेवली (ACNS, एअर) यांनी प्रदान केला.

advertisement

या प्रसंगी नौदलाने ट्विट करुन याची माहिती दिली आहे. नेव्हल एव्हिएशनमध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला असून आस्था या पहिल्या महिल्या फायटर पायलट असणार आहेत असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. नौदलाच्या या निर्णयाचं कौतुक होत आहे तर आस्था यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणि नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सध्या आस्था यांना कोणते फायटर एअरक्राफ्ट सोपवले जाईल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही, भारतीय नौदलाकडे काही खास लढाऊ विमाने आहेत, ज्यात मिग-२९K प्रमुख आहे. ही फायटर जेट्स आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत यांसारख्या एअरक्राफ्ट कॅरियर्सवरून उड्डाण करू शकतात.

advertisement

मिग-२९K ची प्रमुख वैशिष्ट्ये:

कॉम्बॅट रेंज: ७२२ किलोमीटर

नॉर्मल रेंज: २३४६ किलोमीटर

शस्त्र क्षमता: ४५० किलोग्रामपर्यंतचे बॉम्ब, क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत. ही फायटर जेट्स विशेषतः सागरी मोहिमांसाठी तयार करण्यात आली आहेत.

ज्यांना संरक्षण दलात आपलं करियर करायचं आहे त्यांच्यासाठी आस्था पुनिया अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणा असणार आहेत. सब-लेफ्टनंट आस्था पुनिया यांनी असा इतिहास रचला आहे, जो येणाऱ्या पिढ्या अभिमानाने लक्षात ठेवतील. भारतीय नौदलाने महिलांना मुख्य प्रवाहात आणून देशाची संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

advertisement