TRENDING:

'बाप-लेका'ची परीक्षा! इंडिगोमुळे फ्लाइट रद्द, वडिलांनी काळोख्या रात्रीत मुलासाठी रात्रभर 800 किमी चालवली गाडी

Last Updated:

इंडिगो एअरलाइन्स फ्लाइट रद्द झाल्यावर राजनारायण पंघाल यांनी ८०० किमी सलग कार चालवून आशीष चौधरी पंघालला इंदूरला वेळेवर परीक्षेसाठी पोहोचवलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लॉकडाऊनमधली आई आठवतेय का? जिने जीव तोडून मुलासाठी 1400 किमीचं अंतर कापलं होतं. मुलगा अडकला म्हणून तिने इतक्या लांब ड्राइव्ह करुन मुलाला परत घरी घेऊन आल्या. पोलिसांची परवानगी काढून त्यांनी 1400 किमीचा प्रवास मुलासाठी स्वत: गाडी चालवून केला होता. आता वडिलांना मुलासाठी चक्क 800 किमी सलग प्रवास स्वत: गाडी चालवून केला आहे. या वडिलांची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा होत आहे.
News18
News18
advertisement

असा बापमाणूस प्रत्येकाला मिळावा असं सोशल मीडियावर युजर्स म्हणत आहेत.इंडिगो एअरलाइन्सने फ्लाइट कॅन्सल केली आणि त्यामुळे परीक्षेला निघालेला मुलाचं नुकसान होऊ नये म्हणून वडिलांनी हे पाऊल उचललं. इंडिगो एअरलाइन्सची विमाने अचानक रद्द झाली, तेव्हा देशभरातील हजारो प्रवाशांचे हाल झाले. याच गोंधळात हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील मायना गावातील एका कुटुंबालाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. पण या कसोटीच्या क्षणी एका वडिलांनी घेतलेला निर्णय जबाबदारी, समर्पण आणि बाप अन् मुलाच्या नात्याची एक जबरदस्त मिसाल बनली.

advertisement

मायना गावातील आंतरराष्ट्रीय नेमबाज आशीष चौधरी पंघाल इंदूर येथील प्रतिष्ठित डेली कॉलेजमध्ये १२ वीचे विद्यार्थी आहेत. परीक्षेपूर्वी काही दिवसांची सुट्टी घालवून ते घरी आले होते. ६ डिसेंबरला त्यांच्या कॉलेजमध्ये सन्मान समारंभ होता, ज्यात आशीषला सन्मानित केले जाणार होते. शिवाय, त्यांची प्री-बोर्ड परीक्षा ८ डिसेंबरपासून सुरू होणार होती. या दोन्ही महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आशीष आणि त्यांचे वडील राजनारायण पंघाल यांनी दिल्ली ते इंदूरची इंडिगो फ्लाइट आधीच बुक केली होती.

advertisement

६ डिसेंबर रोजी आशीषचे वडील राजनारायण पंघाल त्यांना एअरपोर्टवर सोडण्यासाठी दिल्लीला पोहोचले. पण एअरपोर्टवर पोहोचताच इंदूरला जाणारी इंडिगोची फ्लाइट अचानक रद्द झाली होती. फ्लाइट रद्द झाल्यामुळे केवळ सन्मान सोहळ्यावरच नाही, तर ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आशीषला परीक्षेला बसता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती.

वडिलांनी तात्काळ रेल्वे स्टेशन गाठले आणि 'तत्काळ'मध्ये तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला, पण इंदूरसाठी सीट मिळणे जवळजवळ अशक्य होते. तेव्हा वडील राजनारायण पंघाल यांनी वेळ न घालवता एक मोठा निर्णय घेतला. 'जे काही होईल, पण मुलाला वेळेवर इंदूरला पोहोचवायचेच!' दिल्ली ते इंदूरचे अंतर अंदाजे ८०० किलोमीटर आहे आणि यासाठी १२ ते १४ तास लागतात. राजनारायणांनी त्याच संध्याकाळी कार सुरू केली आणि रात्रभर सलग ड्राइव्ह केलं. त्यांना थकव्याची किंवा हवामानाची पर्वा नव्हती; फक्त मुलाची परीक्षा चुकणार नाही, याची चिंता होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं लावलं डोकं, डाळिंबाच्या बागेत घेतलं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात
सर्व पहा

राजनारायण पंघाल यांनी सांगितले, "फ्लाइट कॅन्सल झाल्याच्या बातमीने आम्ही हादरलो होतो. परीक्षा मुलाच्या भविष्याचा प्रश्न होता. मी ठरवले की, संपूर्ण रात्र ड्राइव्ह करावी लागली तरी चालेल, पण मुलाला वेळेवर पोहोचवायचे." रात्रभरच्या अथक प्रयत्नानंतर पिता-पुत्र दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेवर इंदूरला पोहोचले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. मुलाला वेळेत परीक्षा पोहोचवल्याचं सुख त्यांच्या चेहऱ्यावर होतं चिंता मिटली होती.

advertisement

मराठी बातम्या/देश/
'बाप-लेका'ची परीक्षा! इंडिगोमुळे फ्लाइट रद्द, वडिलांनी काळोख्या रात्रीत मुलासाठी रात्रभर 800 किमी चालवली गाडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल