जी२० शिखर परिषदेवेळी इटली आणि चीन यांच्यातली ही चर्चा महत्त्वाची ठरली. इटलीने थेट बीआरआयमधून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं आहे. चीनच्या अब्जावधी डॉलरच्या या प्रोजेक्टचा इटलीला काहीच फायदा झालेला नाही असं सांगण्यात आलंय. नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीवेळी जियोर्जिया मेलोनी यांनी ली कियांग यांना सांगितलं की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अत्यंत महत्त्वकांक्षी अशा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून बाहेर पडण्याची योजना इटली आखत आहे. मात्र तरीही चीनसोबत मैत्रीपूर्ण संबंध राहतील असंही इटलीने स्पष्ट केलं.
advertisement
G20 Summitचे पुढचे अध्यक्षपद ब्राझीलकडे, पंतप्रधान मोदींनी लुला डा सिल्वांकडे सोपवली बॅटन
इटलीने २०१९मध्ये करारावर अधिकृत सही केली होती. ५ सप्टेंबरला इटलीचे परराष्ट्र मंत्री एंटोनियो तजानी यांनी चीन दौरा केला होता. त्यांनी बीआरआयवर टीका करताना अपेक्षेप्रमाणे यातून काही साध्य झालं नसल्याचं म्हटलं होतं. इटलीचे अनेक पक्ष या कराराविरोधात होते. चीन पुढच्या महिन्यात बीजिंगमध्ये बीआरआयची तिसरी परिषद आयोजित करणार आहे.
मेलोनी यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या सरकारकडे बीआरआयवर निर्णय घेण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा वेळ आहे. इटली बीआरआयचा भाग आहे पण चीनसोबत भक्कम व्यापारी संबंध असलेला जी७ देश नाही हा विरोधाभास आहे. इटलीचे संरक्षणमंत्री गुइडो क्रोसेटो यांनी जुलैमध्ये म्हटलं होतं की, चार वर्षांपूर्वी बीआरआयमध्ये सहभागी होण्याचा इटलीने एक क्रूर निर्णय घेतला. कारण त्यांनी निर्यातीला चालना देण्यासाठी काही केलं नव्हतं.
इटलीच्या तत्कालीन सरकारने बीआरआयवर सह्या केल्या आणि असं करणारा तो एकमेव पाश्चिमात्य देश ठरला. परराष्ट्र मंत्री एंटोनियो ताजानी यांनी शनिवारी म्हटलं की, चीनसोबत बेल्ट अँड रोडमध्ये चार वर्षांपूर्वी इटली सहभागी झाला. पण यात सहभागी होऊनही दोन्ही देशात अपेक्षेनुसार व्यापार वृद्धी झाली नाही.
