आचार्य रघुनाथ विनायक धुळेकर हे झाशी-ललितपूर लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार होते. 1952 ते 1957 पर्यंत ते झाशीचे खासदार होते. पंडित नेहरू यांच्यासोबतच्या मतभेदामुळे त्यांना पुन्हा तिकिट मिळाले नव्हते. राजकीय तज्ज्ञ सांगतात की, रघुनाथ धुळेकर यांना हिंदी बोलणे आणि हिंदीची वकिली केल्यामुळे शिक्षा मिळाली होती.
आचार्य रघुनाथ विनायक धुळेकर यांचा जन्म हा 1891 मध्ये झाला होता. ते मूळचे मराठी होते. असे असतानाही त्यांना हिंदीबाबत विशेष प्रेम होते. इंटरनॅशनल बुद्धिस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष हरगोविंद कुशवाह यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रघुनाथ धुळेकर सुरुवातीपासूनच हिंदीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी पुढाकार घेत असत.
advertisement
एकदा ते संसदेत हिंदीत भाषण देत होते. यावर माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना थाबंवले होते आणि संसदेत विविध भाषा जाणणारे लोक आहेत. तुम्ही इंग्रजीत बोललात तर सगळ्यांना समजेल, असे नेहरू म्हणाले.
सीमा हैदर-सचिन मीणा प्रकरणात मोठी अपडेट, दोघांच्या अडचणी वाढणार, आता काय घडलं?
धुळेकर 10 भाषांचे जाणकार -
नेहरू यांची ही बाब ऐकल्यावर धुळेकर यांनी इंग्रजीसोबतच मराठी, गुजराती, उडिया, बंगाली, मल्याळम, कन्नड, संस्कृत सह 10 भाषांमध्ये भाषण दिले. धुळेकर यांनी नेहरू यांना म्हटले होते की, हिंदी ही भारताला जोडणारी भाषा आहे. त्यामुळे हिंदीला राजभाषेचा दर्जा द्यायला हवा. यानंतर नेहरू आणि धुळेकर यांच्यामध्ये मतभेद झाले आणि 1957 मध्ये धुळेकर यांचे तिकिट कापण्यात आले आणि झाशी मतदासंघातून डॉ. सुशीला नैय्यर यांना तिकीट देण्यात आले.
तिकिट कापल्यानंतरही धुळेकर यांनी पक्षाचा आदर केला आणि डॉ. नैय्यर यांच्यासाठी प्रचार केला. हरगोविंद कुशवाहा हे सांगतात की, 1957 नंतर रघुनाथ धुळेकर यांनी केंद्राच्या राजकारणातून संन्यास घेतला. हिंदीच्या भाषेसाठी पुढाकार घेतल्याने त्यांना शिक्षा देण्यात होती. त्यानंतर 6 वर्षे ते उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापतीही होते. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते राजकारणातून निवृत्त झाले.