द्विपक्षीय चर्चेवेळी पंतप्रधान मोदी यांनी कॅनडात भारतविरोधी हालचालींचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर ट्रुडो यांनी देशात द्वेष आणि हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. कॅनडात खलिस्तानींना आश्रय मिळत असल्याने भारताने कठोर भूमिका घेतली आहे. दरम्यान, विमानात बिघाड झाल्यानंतर तब्बल 36 तास जस्टिन ट्रुडो दिल्लीत अडकले. जस्टिन ट्रुडो हे त्यांच्या मुलासोबतच हॉटेलमध्ये दिवसभर थांबले.
advertisement
G20 Summit: ब्राझीलला पुढील G20 शिखर परिषदेचे यजमानपद का मिळाले? पुढे कोणाचा नंबर आहे हे कसे ठरते?
भारताच्या पराष्ट्र मंत्रालयाकडून असेही स्पष्ट कऱण्यात आले की, जस्टीन ट्रुडो यांच्या दिल्लीत मुक्कामाबाबत आणि अधिकृत बैठकीबाबत कोणत्याही प्रकारचे निवदेन मिळालेलं नाही. तर विमानतळावर जस्टिन ट्रुडो यांचे स्वागत करणाऱ्या राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, आम्हाला फक्त स्वागत कऱण्याची जबाबदारी दिली होती.
सरकारकडून सांगण्यात आले की, कॅनडाचे एअर फोर्स जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या प्रतिनिधींना नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कॅनडातून एक बॅकअप विमान त्यांना नेण्यासाठी येत आहे. मंगळवारी दुपारनंतर कॅनडाचे पंतप्रधान रवाना होऊ शकतात. दिल्लीत जपान आणि कॅनडाच्या पंतप्रधानांसाठी हॉटेल ललित बूक करण्यात आले होते. हॉटेलमधील 30 खोल्यांमध्ये कॅनडाचे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी थांबले होते.
