TRENDING:

सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला, प्रसिद्ध कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या, सेल्फीसाठी आले अन्...

Last Updated:

Kabaddi Player Rana Balachauria Case: कबड्डी विश्वाला हादरवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबमधील मोहाली येथील सोहाना परिसरात एका खासगी कबड्डी स्पर्धेदरम्यान कबड्डी खेळाडू आणि प्रमोटर राणा बलाचौरिया यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कबड्डी विश्वाला हादरवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबमधील मोहाली येथील सोहाना परिसरात एका खासगी कबड्डी स्पर्धेदरम्यान कबड्डी खेळाडू आणि प्रमोटर राणा बलाचौरिया यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. बलाचौरिया यांच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या वरच्या भागात चार ते पाच गोळ्या लागल्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
News18
News18
advertisement

मोहालीचे पोलीस अधीक्षक हरमनदीप हंस यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने खेळाडूंकडे गेले. राणा बलाचौरिया थांबताच त्यांनी अचानक गोळीबार केला. त्यांना ताबडतोब मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली. उपचारादरम्यान काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की गोळ्या अगदी जवळून मारण्यात आल्या आहेत.

advertisement

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून पळून गेले. पोलिसांनी परिसरातील सुरक्षा वाढवली आहे आणि सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीचा आढावा घेत आहेत. या घटनेत बंबीहा गँगचा सहभाग असल्याचं सांगितलं जात असलं तरी, पोलिसांनी अधिकृतपणे त्याची पुष्टी केलेली नाही.

या घटनेच्या काही वेळआधी कबड्डी स्थळी उपस्थित राहणाऱ्या प्रसिद्ध पंजाबी गायकाशी याचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, सोहानामध्ये राणा बलाचौरियाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी बंबीहा टोळीशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात ही सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचं म्हटलं आहे.

advertisement

सोशल मीडियावर पोस्ट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा मोठी वाढ, कांदा आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

पंजाबी भाषेत केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, राणा बलाचौरियाची आज मोहाली सोहाना साहिब कबड्डी स्पर्धेदरम्यान हत्या करण्यात आली. मी, डोनी बाल शगनप्रीत, मोहब्बत रंधावा, अमर खेवा प्रभदासवाल आणि कौशल चौधरी, या हत्येची जबाबदारी घेतो. या माणसाने जग्गू खोटी आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यासोबत मिळून आमच्याविरुद्ध काम केले. त्याने सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्याला आश्रय दिला. मारेकऱ्यांची वैयक्तिक काळजी घेतली. आज, आम्ही राणाला मारून आमचा भाऊ मूसेवालाचा बदला घेतला. हे काम आमचे मक्खन अमृतसर आणि डिफॉल्टर करण यांनी केलं. आजपासून, मी सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना विनंती करतो की जग्गू खोटी आणि हॅरी टॉटच्या संघात कोणीही खेळू नये. खेळलं तर त्यांचीही अशीच अवस्था होईल. आम्हाला कबड्डीची कोणतीही अ‍ॅलर्जी नाही. पण खोटी आणि हॅरी टॉटच्या कबड्डीमध्ये आम्हाला कोणताही हस्तक्षेप नको आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला, प्रसिद्ध कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या, सेल्फीसाठी आले अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल