TRENDING:

गोव्यानंतर केरळात मध्यरात्री अग्नितांडव, प्रसिद्ध आष्टमुडी तलावात 10 बोटी जळून खाक, नक्की काय घडलं

Last Updated:

केरळच्या कोलम येथील प्रसिद्ध आष्टमुडी तलावात काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तलावाकाठी उभ्या असलेल्या दहा बोटी जळून खाक झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलम: शनिवारी रात्री उशिरा गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये भीषण आगीची घटना समोर आली आहे. या आगीत एकूण २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची ही घटना ताजी असताना आता केरळमध्ये देखील भीषण आगीची घटना समोर आली आहे. केरळच्या कोलम येथील प्रसिद्ध आष्टमुडी तलावात काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तलावाकाठी उभ्या असलेल्या दहा बोटी जळून खाक झाल्या आहेत.
News18
News18
advertisement

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग नेमकी कोणत्या वेळी लागली आणि तिचे कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आग इतकी भीषण होती की, आगीने अवघ्या काही सेकंदात आसपासच्या १० बोटींना आपल्या विळख्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून ही आग विझवली.

advertisement

आष्टमुडी तलाव हा मासेमारी आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या तलावावर अनेक मच्छिमार कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मासेमारी बोटी जळून खाक झाल्यामुळे या मच्छिमारांना मोठा फटका बसला आहे. या नुकसानीमुळे त्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होणार आहे.

आग लागण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. शॉर्ट सर्किट किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा सखोल तपास करून पंचनामा केला जात आहे.

advertisement

गोव्यात नाईट क्लबमध्ये मृत्यूतांडव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि मक्याची पुन्हा दर वाढ, कांद्याला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट घडून भीषण आग लागली. या आगीत काहीजणांचा होरपळून तर काहींचा जीव गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना इतकी भयंकर होती, सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर आजुबाजुचा सगळा परिसर हादरून गेला होता.

मराठी बातम्या/देश/
गोव्यानंतर केरळात मध्यरात्री अग्नितांडव, प्रसिद्ध आष्टमुडी तलावात 10 बोटी जळून खाक, नक्की काय घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल