TRENDING:

बस अग्निकांड प्रकरणात मोठी अपडेट! 200 मोबाइल नेणं महागात पडलं, एका चुकीनं केला 32 प्रवाशांचा कोळसा

Last Updated:

शुक्रवारी सकाळी हैदराबाद-बेंगळुरू महामार्गावर एक भीषण अपघात घडला. कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुरु गावाजवळ कावेरी ट्रॅव्हल्सच्या एका खाजगी बसला आग लागली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Bus Fire : शुक्रवारी सकाळी हैदराबाद-बेंगळुरू महामार्गावर एक भीषण अपघात घडला. कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुरु गावाजवळ कावेरी ट्रॅव्हल्सच्या एका खाजगी बसला आग लागली. या आगीत किमान 32 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बस एका मोटारसायकलला धडकली, ज्यामुळे काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. बारा प्रवासी पळून जाण्यात यशस्वी झाले. आग वेगाने पसरल्याने उर्वरित लोक आत अडकले.
News18
News18
advertisement

बस वेगाने जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. मोटारसायकलशी धडकल्यानंतर बसच्या पुढच्या भागाला आग लागली आणि काही सेकंदातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, परंतु अनेक जण आगीत अडकले. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही ती लगेच विझवता आली नाही. प्रथमदर्शनी बाईकला धडक होऊन हा अपघात झाला असल्याची बातमी पसरली.

advertisement

दुचाकी बसखाली अडकल्याने झाला स्फोट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि दुचाकीच्या धडकेनंतर दुचाकी फ्यूल टँकमध्ये घुसली. याच कारणामुळे बसचा स्फोट झाला आणि बसने क्षणार्धात पेट घेतला. आग इतकी भयंकर होती की, बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अपघात झाला तेव्हा बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते. काही प्रवाशांनी खिडक्या तोडून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण अनेक लोक आतच अडकले आणि होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

advertisement

बसमध्ये 200 पेक्षा अधिक स्मार्ट फोन्स

भरधाव वेगाने जाणाऱ्या या बसला आग लागण्याचं कारण जरी दुचाकी होती तरी ती आग वेगाने पसरण्याच कारण देखील समोर आलं आहे. टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, या बसमध्ये 200 पेक्षा अधिक स्मार्ट फोन्स होते जे बंगळुरूहून हैदराबाद येथे घेऊन गेले जात होते. प्रथमदर्शनी तपासात असा अंदाज व्यक्त केला जात आहे की जेव्हा आग लागली तेव्हा हैदराबाद बेस्ड बिजनेसमॅन मंगनाथ हे जवळपास 46 लाख रुपये किंमतीचे फोन्स या बसमधून ट्रान्सपोर्ट करत होते.

advertisement

फोन्सच्या बॅटरीमुळे ही आग भयंकर वाढल्याचा अंदाज आहे. बाईकला धडक होऊन आधीच फ्यूल पसरलं होत. त्यात बॅटरीमध्ये असणारे लिथियमने आणखी पेट घेतला. ज्यामुळे हा स्फोट आणखी तीव्र झाला. ज्यामुळे आगीचा भडका उडाला. या अपघातात जीव वाचलेल्यानी या संपूर्ण भयावह अपघाताची माहिती दिली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की, बसला आग लागली त्यानंतर बसमधून खूप जोरात काही फुटल्याचा आवाज येऊ लागला, जे कदाचित मोबाईल फोन्सची बॅटरी फुटल्यामुळे असण्याची शक्यता वर्तवली गेली.

advertisement

पॅसेंजर बसमध्ये कमर्शियल वाहतूक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

पॅसेंजर बसमध्ये कमर्शियल मालवाहतूक करणे हा गुन्हा आहे. अशातच आता इन्वेस्टीगेटर याबाबत बस चालकाची चौकशी करत आहेत. कायद्याने गुन्हा असून पॅसेंजर बसमध्ये कमर्शियल वाहतूक का गेली? हा प्रश्न आता उद्भवू लागला आहे.

मराठी बातम्या/देश/
बस अग्निकांड प्रकरणात मोठी अपडेट! 200 मोबाइल नेणं महागात पडलं, एका चुकीनं केला 32 प्रवाशांचा कोळसा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल