ऑटोमधून १५ जण प्रवास करत होते. त्यापैकी ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघाताची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
अपघातात ऑटो चालक मनोज कुमारचा मृत्यू उपचारावेळी झाला. तर दिवाना कुमार, छोटू कुमार, अमित कुमार आणि रामू कुमार यांची नावे समजली आहे. हे सर्व जण मुंगेर जिल्ह्यातील होते. इतर मृतांची ओळख पटलेली नाही.
advertisement
पोलिसांनी मृतांच्या मोबाईलमधून नंबर शोधून कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जखमींची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला जात आहे. लखीसरायमधील सागर यादव, मुंगेर जमालपूरच्या रितिक कुमार यांची ओळख पटलीय. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती आणि काही काळ वाहतूक कोडीं झाली होती.