या प्रतिज्ञापत्रानुसार सरमा आणि त्यांच्या पत्नीची एकत्रित संपत्ती आता 35.15 कोटी झाली आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2021 मध्ये ही संपत्ती 17.27 कोटी होती, तर 2026 मध्ये ती केवळ 6.38 कोटी होती.
मुख्यमंत्र्यांची स्वतःची संपत्ती
प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार मुख्यमंत्री सरमा यांची सर्व मालमत्ता चल स्वरूपाची असून तिची एकूण किंमत 2.36 कोटी आहे. 2021 मध्ये ही रक्कम 1.72 कोटी होती.
advertisement
संपत्तीचा तपशील
रोख रक्कम: 2.28 लाख
बँक खात्यांमधील शिल्लक: 68,01,943 चार वेगवेगळ्या खात्यांमध्ये
कर्जे आणि अग्रिम रक्कम: 1.41 कोटी यात पत्नीला दिलेले 78.24 लाखांचे कर्जही समाविष्ट
सोने: 180 ग्रॅम सध्याची किंमत 25.10 लाख
विशेष म्हणजे सरमा यांनी बाँड्स, डिबेंचर्स, शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा इतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केलेली नाही. त्यांच्याकडे कोणतेही वाहन किंवा जीवन विमा पॉलिसी नाही. त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत सरकारी वेतन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पत्नी रिनिकी भुयान सरमा यांची संपत्ती
कुटुंबाच्या एकूण संपत्तीचा मोठा वाटा रिनिकी भुयान सरमा यांच्याकडे आहे. Pride East Entertainment च्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या रिनिकी यांची एकूण संपत्ती 32.79 कोटी आहे.
चल मालमत्ता 13.54 कोटी
रोख रक्कम: 3.16 लाख
बँक ठेवी: 74.85 लाख
बिगर सूचिबद्ध कंपनीचे शेअर्स: 2.74 कोटी
म्युच्युअल फंड: 2.32 कोटी
विमा पॉलिसीचे Surrender मूल्य: 1,77,55,531
दिलेली कर्जे: 3.69 कोटींहून अधिक
जीप (2018 मध्ये खरेदी): 21.60 लाख
सोन्याचे दागिने: 1.45 किलो (सध्याची किंमत 2.03 कोटी)
स्थावर मालमत्ता
मुख्यमंत्री सरमा यांच्याकडे कोणतीही जमीन किंवा स्थावर मालमत्ता नाही. मात्र त्यांच्या पत्नीकडे तीन बिगरशेती मालमत्ता असून त्यांची एकूण किंमत 19.25 कोटी आहे.
या मालमत्तांचा तपशील
12,960 चौरस फूट भूखंड व घर: सध्याची किंमत 1.60 कोटी
वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता: किंमत 1.40 कोटी
2022 मध्ये खरेदी केलेला 2,127 चौरस फुटांचा भूखंड: सध्याची किंमत 4.25 कोटी
देणी किती?
प्रतिज्ञापत्रात कुटुंबाच्या देण्यांचाही उल्लेख आहे.
मुख्यमंत्री सरमा यांच्या देणी: 95.05 लाख
पत्नी रिनिकी यांच्या देणी: 15.91 कोटी
दहा वर्षांतील संपत्तीची वाढ
| वर्ष | एकूण संपत्ती |
| 2016 | 6.38 कोटी |
| 2021 | 17.27 कोटी |
| 2026 | 35.15 कोटी |
म्हणजेच गेल्या दहा वर्षांत कुटुंबाची संपत्ती सुमारे साडेपाच पटींनी वाढली आहे. तर 2021 ते 2026 या केवळ पाच वर्षांत ती दुप्पट झाली आहे.
