लाइव्ह लॉ नुसार, कोर्ट इरोड जिल्ह्यातील रहिवासी थंगमनी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की विधवा असल्याने तिला आणि तिच्या मुलाला काही गावकऱ्यांकडून स्थानिक मंदिरात जाण्यापासून आणि आगामी मंदिर उत्सवात सहभागी होण्यापासून रोखले जात आहे. या महिलेने न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश यांच्या खंडपीठाला सांगितले की, तिचा नवरा मंदिरात पुजारी होता, ज्याचा 28 ऑगस्ट 2017 रोजी मृत्यू झाला होता. त्यांनी पुढे सांगितले की, तिला तिच्या मुलासोबत मंदिराच्या उत्सवात सहभागी होऊन पूजा करायची होती. पण काही लोक यासाठी विरोध करत होते.
advertisement
या संपूर्ण प्रकरणावर खंडपीठाची तीव्र नाराजी
विधवा असल्यामुळे मंदिरात प्रवेश करू शकत नाही, असा विरोध करणाऱ्यांचा दावा होता. खंडपीठाने या संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती व्यंकटेश म्हणाले की, राज्यात अशा पुरातन समजुती अजूनही प्रचलित आहेत हे दुर्दैवी आहे. न्यायमूर्ती म्हणाले की, 'स्त्रीला स्वतः सन्मान आणि ओळख असते जी तिच्या वैवाहिक स्थितीच्या आधारावर कोणत्याही प्रकारे कमी करता येत नाही किंवा काढून टाकली जाऊ शकत नाही'.
'सुसंस्कृत समाजात हे कधीच चालू शकत नाही'
खंडपीठाने पुढे म्हटले की, कायद्याचे राज्य असलेल्या सुसंस्कृत समाजात हे कधीही चालू शकत नाही. एखाद्या विधवेला मंदिरात जाण्यापासून रोखण्याचा असा प्रयत्न कोणी करत असेल, तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी. याचिकाकर्ता आणि त्याच्या मुलाला उत्सवात सहभागी होण्यापासून आणि देवाची पूजा करण्यापासून रोखण्याचा अधिकार त्यांना नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
वाचा - सुधा मूर्तींनी रागाने लिहीलं पत्र; जेआरडी टाटांनी एका झटक्यात बदलला कंपनीचा नियम
हायकोर्टाने स्थानिक पोलिसांना याचिकाकर्त्याला धमकावणाऱ्यांना बोलावण्याचे निर्देश दिले. यासोबतच याचिकाकर्ते आणि त्यांच्या मुलाला मंदिरात जाण्यापासून आणि यावर्षी 9 आणि 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उत्सवात सहभागी होण्यापासून ते रोखू शकत नाहीत, हे त्यांना स्पष्टपणे कळवावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. याला जर त्यांना विरोध केला तर पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी.