ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये आम्ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. आम्ही जे प्रस्ताव दिले होते ते सर्व काँग्रेसने फेटाळले. माझा प्रस्ताव मान्य केला नाही त्यामुळे आता आम्ही एकटेच निवडणूक लढू. राहुल गांधींची रॅली होत आहे आणि त्याची माहिती आम्हाला दिलेली नाही. आम्ही इंडिया आघाडीत असूनही आम्हाला माहिती नाही दिली.
advertisement
ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केलीय. भाजप नेते गौरव भाटिया यांनी टीका करताना म्हटलं की, गई भैस पानी में, घमंडी या झंडिया? असं म्हणत इंडिया आघाडीवर त्यांनी निशाणा साधला. भाजप नेते गिरीराज सिंह यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींना हरवण्यासाठी हे लोक एकत्र आले होते. पण अहंकारी आघाडीत सर्वांनाच पंतप्रधान व्हायचं आहे. काँग्रेस नेते प्रमोद कृष्ण यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, यांचा निशाणा भाजप नाही तर काँग्रेस आहे. आघाडीतील नेत्यांचे मन एक नाहीय.