मिंकी शर्मा ही संजय प्लेस येथील मारुती प्लाझा येथील दिवीशा टेक्नॉलॉजीच्या कार्यालयात एचआर कर्मचारी होती. 23 जानेवारीला मिंकी ऑफिसला जात असल्याचं सांगून स्कूटरवरून घरातून निघाली, पण संध्याकाळी ती घरी परतली नाही, त्यामुळे कुटुंबाने मिंकीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काळजीमध्ये पडून मिंकीच्या घरच्यांनी तिला शोधायला सुरूवात केली, यानंतर ते ऑफिसला पोहोचले, पण ऑफिस बंद होते. अखेर मिंकीच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
advertisement
सीसीटीव्हीमुळे सापडला मॅनेजर
त्याच रात्री जवाहरपूल येथे एका तरुणीचा मृतदेह पोलिसांना पोत्यात सापडला. पोलीस मिंकी शर्माच्या ऑफिसमध्ये पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ऑफिस मॅनेजर विनय राजपूत हा लिफ्टमधून बाहेर पडत असल्याचं दिसलं. विनय राजपूत लिफ्टमधून बाहेर पडताना पोतं ओढत होता.
सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तो मिंकीच्याच स्कूटरवर पोतं घेऊन निघाल्याचं दिसलं. यानंतर पोलिसांनी विनय राजपूतला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने मिंकीसोबत प्रेमसंबध असल्याचं कबूल केलं. आपण मिंकीबद्दल घरी सांगितलं होतं, मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं, पण मिंकी दुसऱ्या पुरुषासोबत बोलायची, त्यामुळे मी तिला अनेकदा फटकारलं. यावरूनच आमचं ऑफिसमध्ये भांडण झालं आणि मी तिच्यावर चाकूने वार केले, असं विनय राजपूतने कबूल केलं आहे. आग्र्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
मिंकीचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर मला भीती वाटली, त्यामुळे मी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. सगळ्यात आधी मी मिंकीचं शीर पॅक केलं आणि बॅगेमध्ये ठेवले. यानंतर तिचं धड प्लास्टिकमध्ये गुंडाळून एका पोत्यात ठेवले आणि तिच्याच स्कूटरवरून निघालो. पोतं यमुना नदीमध्ये फेकण्याचा माझा विचार होता, पण पोतं जड झालं होतं, त्यामुळे मी ते उचलू शकत नव्हतो, त्यामुळे मी पोतं पुलावरच सोडलं, असं विनय राजपूतने सांगितलं आहे.
विनय राजपूतने मिंकीचे कपडे, मोबाईल फोन आणि शीर झारणा नाल्यात फेकलं. पोलीस आता मिंकीचं शीर शोधण्याचं काम करत आहेत. विनयने मिंकीची स्कूटर जिथे सोडली होती, तीदेखील पोलिसांनी जप्त केली आहे.
क्राईम पेट्रोल पाहून पळायचं शिकला
विनय राजपूतने मिंकीच्या मृतदेहासोबत अनेक तास घालवले. हत्येनंतर, तो पुरावे कसे नष्ट करायचे याचा विचार करत होता. त्याला क्राईम पेट्रोलकडून पाहून कळाले की जर मृतदेह ओळखला गेला नाही तर त्याला पळून जाता येईल. कुटुंबाला वाटेल की मिंकी पळून गेली आहे. हत्येनंतर, त्याने धारदार चाकूने धड शीरापासून वेगळे केले. त्याने हा चाकू हत्येच्या काही दिवस आधी खरेदी केला होता.
विनय राजपूतने पोलिसांना सांगितले की त्याचा मिंकीला मारण्याचा हेतू नव्हता. त्यांच्यात चांगले संबंध होते. भांडण सुरू असताना रागाच्या भरात विनयने मिंकीच्या मानेवर चाकूने भोसकले, ज्यामुळे रक्तस्त्राव झाला. संपूर्ण ऑफिस रक्ताने माखले होते, त्यामुळे विनयला आपण पुरते फसणार हे कळून चुकले, त्यानंतर त्याने ऑफिसमध्ये सांडलेलं रक्त फिनाईलने पुसलं. यानंतर त्याने ऑफिसमध्येच मिंकीचं शीर धडापासून वेगळं केलं. त्याने मिंकीचे कपडेही काढून टाकले. तसंच त्याने मिंकीची ओळख पटेल असं काहीही तिच्या मृतदेहासोबत ठेवलं नाही. मिंकीची ओळखपत्रही त्याने काढून घेतली.
ऑफिसमधून बाहेर पडताना विनयने त्याचा मोबाईल फोनही बंद केला होता, ज्यामुळे तो गुन्ह्याच्या ठिकाणी सापडू नये. मिंकीची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह असलेली बॅग स्कूटर चालवत असताना पायाखाली ठेवली, तसंच मिंकीचं शीर खांद्यावरच्या बॅगेत होतं. यानंतर विनय ऑफिसमधून निघाला आणि जवाहरपूलजवळ पोहोचला. जवाहरपूलवर उंच जाळी होती, त्यामुळे त्याला मृतदेहाची बॅग उचलून फेकणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्याने मृतदेह तिकडेच फेकला. मिंकीची स्कूटर त्याने शाहदरामध्ये सोडली. यानंतर त्याने मित्राला फोन केला आणि त्याच्यासोबत दुचाकीवरून घरी गेला. मित्राला फोन करण्याच्या आधी त्याने त्याचे रक्ताने माखलेले कपडेही फेकून दिले. विनयने घरातून एक जोडी कपडे आधीच आणले होते.
गोल्डन नेल पॉलिशने ओळख
पोलिसांना पोत्यात डोके नसलेला मृतदेह सापडला. मृतदेहाच्या शरिरावर कोणतेही कपडे नव्हते. सुरूवातीला खळबळ टाळण्यासाठी पोलिसांनी मृतदेह सापडल्याची घटना लपवली. तसंच मृतदेहाचं शीर गायब असल्याचं कुणालाच सांगितलं नाही. पोलिसांनी सुरूवातीला मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले.
मृतदेह एका तरुणीचा होता आणि ते स्पष्ट होत होते. महिलेने सोनेरी नेल पॉलिश लावली होती. पोलिसांनी प्रथम आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या बेपत्ता महिलांच्या तक्रारींबद्दल चौकशी केली. डझनभर बेपत्ता झाल्याच्या तक्रारी सापडल्या. पोलिसांनी प्रत्येक घरात एक-एक करून जाऊन त्यांच्याबद्दल माहिती गोळा केली आणि त्यांच्या मेकअपच्या वस्तू तपासल्या. पोलिसांचे एक पथक मिंकी शर्माच्या घरीही पोहोचले आणि मिंकीच्या मेकअपच्या वस्तूंची तपासणी केली. मृतदेहाच्या नखांवर लावलेले सोनेरी नेलपॉलिश तिथे आढळले.
पोलिसांना असे वाटले की फार कमी तरुणी सोनेरी नेलपॉलिश लावतात. त्यानंतर त्यांनी मिंकीच्या कुटुंबाची चौकशी केली, तिचा रंग कसा आहे आणि तिच्या पायांवर किंवा हातांवर काही खुणा आहेत का? असे विचारले. पोलिसांचे एक पथक संजय प्लेस येथे पोहोचले आणि मारुती प्लाझाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मिंकी 23 जानेवारी रोजी कार्यालयात आली होती. पोलिसांना कळले की मिंकी शर्मा एचआर मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या कार्यालयात फक्त चार कर्मचारी होते. राहुल देव या कंपनीचा मालक होता. पोलिसांनी त्यांच्याशीही संपर्क साधला. राहुल देवने पोलिसांना सांगितले की 23 जानेवारी रोजी कार्यालय बंद होते. यानंतर पोलिसांना विनयबद्दल माहिती मिळाली आणि सीसीटीव्ही फुटेजमधून पुरावे सापडले.
मिंकीच्या भावाचं 6 फेब्रुवारीला लग्न होतं, त्यामुळे ती लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होती. 23 जानेवारीला मिंकी लग्नाची पत्रिका कुरिअर करायला जात आहे, त्यानंतर ऑफिसला जाईन असं सांगून निघाली. मिंकीला एक भाऊ आणि दोन बहिणीही आहेत. कुटुंबात सगळ्यात लहान असलेली मिंकी वडिलांना हातभार लावण्यासाठी नोकरी करत होती. दरम्यान मिंकीची हत्या करणाऱ्या विनय राजपूतला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मिंकीच्या कुटुंबाने केली आहे.
