TRENDING:

नागपूरची मुलगी दरीत पडली, झिप लाइनर तुटल्याने घडला मोठा अनर्थ, LIVE VIDEO आला समोर

Last Updated:

Accident Live Video: नागपूर येथील मुलीसोबत मनालीत भीषण अपघात घडला आहे. झिप लायनर तुटल्याने ही मुलगी 30 फूट खाली पडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर येथील रहिवासी असणाऱ्या एका मुलीसोबत मनालीत भीषण अपघात घडला आहे. झिप लायनर तुटल्याने ही मुलगी 30 फूट खाली पडली आहे. सुदैवाने जीव वाचला असून पायाला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर आहे. त्रिशा बीजवे असं जखमी मुलीचं नाव असून, ती खाली पडतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय.
News18
News18
advertisement

नागपूरमधील एका पर्यटक कुटुंबाला मनाली येथे सहलीसाठी गेले होते. प्रफुल्ल बिजवे हे उन्हाळी सुट्टीसाठी पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत मनाली येथे गेले होते. रविवारी, 8 जून रोजी त्रिशा झिप लाइनरवर असताना अचानक त्याची केबल तुटली आणि त्रिशा ३० फूटावरून खाली पडली. त्रिशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

सुदैवाने जीवितहानी नाही

झिप लाइनरला कमरेचा असलेला बेल्ट तुटल्याने तरुणी 30 फूट खाली पडली त्यामुळे पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. सुरक्षेच्या अनुषंगाने तिथे कोणतीही व्यवस्था नव्हती, उपचारही वेळेत न दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. हा अपघात घडल्यानंतर तिला तातडीने मनाली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण तिथे तिच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. यानंतर तिला चंदीगडला हलवण्यात आलं. इथं प्राथमिक उपचार घेतल्यानंतर आता मुलीला घेऊन तिचं कुटुंब नागपुरला आलं आहे. सध्या त्रिशावर नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

advertisement

घटनेचा व्हिडीओ आला समोर

advertisement

कुटुंबाने म्हटले आहे की, तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती..कुटुंबाला तिथे कोणतीही मदत मिळाली नाही. त्रिशावर सुरुवातीला मनाली नंतर चंदिगडमध्ये उपचार करण्यात आले. सध्या त्रिशावर नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबाने घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी बातम्या/देश/
नागपूरची मुलगी दरीत पडली, झिप लाइनर तुटल्याने घडला मोठा अनर्थ, LIVE VIDEO आला समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल