TRENDING:

Monalisa : कुंभमेळ्यातील मोनालिसा फरहानच्या प्रेमात; आधी केरळ गाठलं, मग पोलिसांकडे मागितलं संरक्षण, नेमकं काय घडलं?

Last Updated:

'व्हायरल गर्ल' एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. महाकुंभमध्ये सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या मोनालिसाने आता थेट केरळमधील पोलीस ठाण्यात धाव घेत संरक्षणाची मागणी केली आहे. यामागे तिचं प्रेम प्रकरण आणि घरच्यांचा विरोध असल्याचे समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडियाचे युग अजब आहे. कधी कोणाचे नशीब पालटेल सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्यात एका तरुणीने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. घाऱ्या डोळ्यांची आणि साध्या वेशभूषेतील ती मुलगी म्हणजे मोनालिसा भोसले. रुद्राक्ष आणि माळा विकणारी ही सामान्य मुलगी तिच्या सौंदर्यामुळे रातोरात 'नॅशनल क्रश' बनली.
मोनालिसा भोसले
मोनालिसा भोसले
advertisement

मात्र, आता हीच 'व्हायरल गर्ल' एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. महाकुंभमध्ये सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या मोनालिसाने आता थेट केरळमधील पोलीस ठाण्यात धाव घेत संरक्षणाची मागणी केली आहे. यामागे तिचं प्रेम प्रकरण आणि घरच्यांचा विरोध असल्याचे समोर आले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी असलेली मोनालिसा भोसले हिचे महाराष्ट्रातील फरमान नावाच्या तरुणावर प्रेम जडलं. गेल्या दीड वर्षांपासून फेसबुकच्या माध्यमातून सुरू झालेल्या या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, या आंतरधर्मीय लग्नाला (Inter-religious marriage) मोनालिसाच्या वडिलांचा, जयसिंग भोसले यांचा तीव्र विरोध होता. तिचे वडील तिचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावून देण्याचा प्रयत्न करत होते, असा दावा मोनालिसाने केला आहे.

advertisement

केरळमध्ये का मागितली सुरक्षा?

मोनालिसा आणि फरमान यांनी आपल्या आयुष्याचा निर्णय घेत केरळ गाठलं. तिरुवनंतपुरम येथील तंपानूर (Thampanoor) पोलीस ठाण्यात या प्रेमी युगुलाने धाव घेतली. केरळ हे सुरक्षित राज्य असल्याचे वाटल्याने त्यांनी तेथे येण्याचा निर्णय घेतला. तंपानूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनालिसा आता 18 वर्षांची (प्रौढ) आहे, त्यामुळे तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. पोलिसांनी तिचे वडील आणि घरच्यांना बोलावून समज दिली आहे आणि आता मोनालिसाने फरमानसोबत राहण्याचा तिचा निर्णय ठाम असल्याचे पोलिसांना सांगितलं आहे.

advertisement

प्रयागराजच्या महाकुंभमध्ये मोनालिसा जेव्हा रुद्राक्षाच्या माळा विकत होती, तेव्हा एका कंटेंट क्रिएटरने तिचा व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर तिला 'महाकुंभची मोनालिसा' ही ओळख मिळाली. तिच्या याच लोकप्रियतेमुळे तिला 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटात मुख्य भूमिकाही मिळाली. एका गरीब कुटुंबातील मुलगी थेट मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने तिचे खूप कौतुक झाले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
विम्यासाठी तो प्रकार, थांबा! चूक अंगलट येईल, एक रुपायाही सुद्धा भेटणार नाही, Video
सर्व पहा

मात्र, प्रसिद्धीसोबतच तिला अनेक संकटांचाही सामना करावा लागला. कुंभमेळ्यात वाढलेल्या गर्दीमुळे आणि चाहत्यांच्या त्रासामुळे तिला लवकर मेळा सोडून घरी जावे लागले होते. आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या नवीन वळणामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

मराठी बातम्या/देश/
Monalisa : कुंभमेळ्यातील मोनालिसा फरहानच्या प्रेमात; आधी केरळ गाठलं, मग पोलिसांकडे मागितलं संरक्षण, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल