TRENDING:

फरमानशी निकाह नाही तर बांधली लग्नगाठ; मोनालिसाच्या 'रिअल लाईफ केरला स्टोरी'मुळे सोशल मीडियावर चर्चा

Last Updated:

कुटुंबाचा तीव्र विरोध आणि जिवाचा धोका पत्करून मोनालिसाने तिचा प्रियकर फरमान खानसोबत विवाहाची गाठ बांधली आहे. पण हा कोणताही 'निकाह' नव्हता, तर हिंदू धर्माच्या पवित्र विधींनी पार पडलेला लग्नसोहळा होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
केरळ : प्रयागराजच्या महाकुंभमध्ये आपल्या घाऱ्या डोळ्यांच्या जादूनं देशाला वेड लावणारी 'व्हायरल गर्ल' मोनालिसा भोसले आज एका ऐतिहासिक कारणाने पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. ज्याप्रमाणे 'द केरळ स्टोरी' चित्रपटात आंतरधर्मीय प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण होणारे संघर्ष दाखवले गेले होते, अगदी तसंच काहीसं चित्र आता खऱ्या आयुष्यात पाहायला मिळतंय. मात्र, इथे गोष्ट थोडी वेगळी आहे. याला नेटकरी 'रिअल लाईफ केरला स्टोरी 2' असं म्हणत आहेत.
मोनालिसा भोसलीची 'केरला स्टोरी'
मोनालिसा भोसलीची 'केरला स्टोरी'
advertisement

कुटुंबाचा तीव्र विरोध आणि जिवाचा धोका पत्करून मोनालिसाने तिचा प्रियकर फरमान खानसोबत विवाहाची गाठ बांधली आहे. पण हा कोणताही 'निकाह' नव्हता, तर हिंदू धर्माच्या पवित्र विधींनी पार पडलेला लग्नसोहळा होता.

केरळमधील तिरुवनंतपुरमच्या बाहेरील भागात असलेल्या अरुमनूर नैनार मंदिरात 11 मार्चच्या संध्याकाळी 5:30 वाजता हा सोहळा पार पडला. अनेकांना वाटलं होतं की मोनालिसा धर्म बदलून निकाह करेल, पण फरमान आणि मोनालिसाने सर्वांनाच थक्क केलं. फरमान खान (मोहम्मद फरमान) याने मोनालिसाच्या श्रद्धेचा मान राखत हिंदू पद्धतीने लग्न करण्यास संमती दिली. मंदिरात अग्नीला साक्ष मानून या जोडप्याने सात फेरे घेतले.

advertisement

'केरला स्टोरी 2' ची चर्चा का?

सोशल मीडियावर या लग्नाला 'केरला स्टोरी 2' हे नाव पडण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत.

1. कायदेशीर लढा: ज्याप्रमाणे चित्रपटात नायिका स्वतःच्या हक्कासाठी लढते किंवा मुस्लिम तरुणासोबत लग्न करते, तसंच मोनालिसानेही आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन थम्पनूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि स्वतःचं संरक्षण मागितलं.

advertisement

2. राज्याचा पाठिंबा: या विवाहासाठी केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवंकुट्टी, सीपीएम राज्य सचिव एम.व्ही. गोविंदन आणि खासदार ए.ए. रहीम यांनी पाठिंबा दिला. राज्याच्या सर्वोच्च स्तरावरून मिळालेल्या या समर्थनामुळे याला राजकीय आणि सामाजिक वलय प्राप्त झालं आहे.

3. मोनालिसाच्या वडिलांनी तिचं लग्न बळजबरीने दुसऱ्याशी लावण्याचा प्रयत्न केला होता, ज्यातून तिने केरळमध्ये येऊन सुटका करून घेतली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कडाक्याच्या उन्हात वाघोबाचा थाट, सिद्धार्थ उद्यानात बसविण्यात आली खास कूलिंग व्यवस्था, Video
सर्व पहा

मूळची मध्य प्रदेशातील इंदूरची असलेली मोनालिसा आणि महाराष्ट्राचा फरमान यांची ओळख दीड वर्षांपूर्वी फेसबुकवर झाली होती. दरम्यान, 2025 च्या महाकुंभमध्ये मोनालिसाचा फुलांच्या माळा विकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि ती सेलिब्रिटी बनली. तिच्या सौंदर्यामुळे तिला 'नागम्मा' या मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिकाही मिळाली. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती केरळमध्ये आली आणि तिने आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला.

मराठी बातम्या/देश/
फरमानशी निकाह नाही तर बांधली लग्नगाठ; मोनालिसाच्या 'रिअल लाईफ केरला स्टोरी'मुळे सोशल मीडियावर चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल