TRENDING:

नवीन जिंदाल यांच्या लेकीचं लग्न, खासदार सुप्रिया सुळे-कंगना राणावतचे ठुमके, डान्सची रंगीत तालीम पाहाच...!

Last Updated:

खासदार कंगना राणावत यांनी शेअर केलेल्या फोटोत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि स्वत: नवीन जिंदाल नृत्याची तालीम करताना दिसून आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नानिमित होणाऱ्या संगीत सोहळ्यासाठी सर्वपक्षीय सहकारी खासदार नृत्याची रंगीत तालीम करीत आहेत. भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकून यासंबंधीची अपडेट दिली आहे. एरवी राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उडवून देणारे नेते पक्षीय भेद विसरून एकत्रित येऊन नृत्याची रंगीत तालीम करीत आहेत.
सुप्रिया सुळे-कंगना राणावत डान्स व्हिडीओ
सुप्रिया सुळे-कंगना राणावत डान्स व्हिडीओ
advertisement

खासदार कंगना राणावत यांनी शेअर केलेल्या फोटोत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि स्वत: नवीन जिंदाल नृत्याची तालीम करताना दिसून येत आहेत. सहकारी संसद सदस्यांसोबतचे काही फिल्मी क्षण असे कॅप्शन देऊन नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नाच्या संगीताची तालीम करत आहोत, असे कंगनाने सांगितले.

सुप्रिया सुळे यांचे नृत्य चर्चेत

advertisement

अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या लेकाचे लग्न मुंबईत संपन्न झाले. युगेंद्र पवार यांच्या लग्नसोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी नृत्य केले. युगेंद्र यांची वरात मंडपात येत असताना सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील सदस्यांसोबत केलेले नृत्य समाज माध्यमांवर चर्चेचा विषय आहे. खासदार सुळे यांच्या संसदेतील अभ्यासू भाषणांनी त्या नेहमी चर्चेत असतात. मात्र त्यांचे वेगळे रुपही यानिमित्ताने महाराष्ट्राला पाहायला मिळाले?

advertisement

ज्यांच्यासाठी महिला खासदारांचा 'नाच', ते नवीन जिंदाल कोण आहेत?

उद्योगपती आणि जिंदाल स्टील अँड पॉवरचे अध्यक्ष नवीन जिंदाल यांनी २००४ मध्ये कुरुक्षेत्रातून काँग्रेस खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला. जिंदाल २००९ मध्ये पुन्हा निवडून आले. २०१४ नंतरच्या काळात त्यांचे काँग्रेस पक्षात मन रमेनासे झाले. २०२४ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर कुरुक्षेत्र हरियाणा येथून निवडणूक लढवली आणि पुन्हा संसदेत पाऊल ठेवले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याची आवक वाढली, पण दर घसरलेलेच, सोयाबीन आणि मक्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

नवीन जिंदाल यांची राजकीय मुळे खोलवर रुजलेली आहेत. त्यांच्या आई सावित्री जिंदाल यांनी पतीच्या ओ.पी.यांच्या जाण्यानंतर सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवले. २००५ ची हिसार पोटनिवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली. २००९ मध्येही त्यांनी विजय प्राप्त केला. हरियाणाच्या माजी कॅबिनेट मंत्री असलेल्या सावित्री राज्यातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनल्या. २०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर, आणि २०२९ ला पराभूत झाल्यानंतर त्यांचेही मन काँग्रेसमध्ये रमले नाही. २०२४ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली. २०२४ ची हरियाणा विधानसभा निवडणूक भाजपच्या पाठिंब्यावर त्यांनी हिसारमधून अपक्ष म्हणून लढवली, मतदारांनी साथ दिल्याने त्यांनी हिसारमधून विजय मिळवला.

advertisement

मराठी बातम्या/देश/
नवीन जिंदाल यांच्या लेकीचं लग्न, खासदार सुप्रिया सुळे-कंगना राणावतचे ठुमके, डान्सची रंगीत तालीम पाहाच...!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल