महिला पोलिसांचा पहिलावहिला संपूर्ण ताफा
गृहराज्यमंत्री संघवी यांनी सांगितले की, पहिल्यांदाच संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत केवळ महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी असतील. नवसारी जिल्ह्यातील वंसी बोरसी गावातील हेलीपॅडवर पंतप्रधान मोदींच्या आगमनापासून ते कार्यक्रमस्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण सुरक्षा व्यवस्था महिला पोलिसांकडे असेल.
या मोहिमेत IPS अधिकारी, पोलिस अधीक्षक, निरीक्षक आणि कॉन्स्टेबल यांचा समावेश असेल. 2,100 हून अधिक महिला कॉन्स्टेबल, 187 उपनिरीक्षक, 61 पोलिस निरीक्षक, 16 उपअधीक्षक (DSP), 5 पोलिस अधीक्षक (SP), 1 आयजीपी (IGP) आणि 1 अतिरिक्त DGP दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
advertisement
लखपती दीदी संमेलनाला पंतप्रधान मोदी उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 आणि 8 मार्च रोजी गुजरात आणि दादरा आणि नगर हवेली दौऱ्यावर असतील. 8 मार्च रोजी नवसारी जिल्ह्यात ‘लखपती दीदी संमेलन’ या भव्य कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहेत.
महिला IPS अधिकारी सुरक्षा प्रमुख
या ऐतिहासिक सुरक्षाव्यवस्थेचे नेतृत्व वरिष्ठ महिला IPS अधिकारी आणि गृहसचिव निपुणा तोरवणे करणार आहेत. गुजरात पोलिसांचा हा उपक्रम संपूर्ण जगाला महिला सशक्तीकरणाचा नवा संदेश देईल आणि गुजरात महिलांसाठी सुरक्षित राज्य आहे, हे अधोरेखित करेल, असे मंत्री संघवी यांनी सांगितले.
