बैठकीपूर्वीच, टीकाकारांनी घोषित केले होते की, G20 केवळ एक दिखावा सिद्ध होईल. परंतु पंतप्रधान मोदींनी या सर्व निराशावादींची भारत मंडपममधून तोंड गप्प केली. जेव्हा सर्व देशांनी G20 घोषणेद्वारे सर्व भू-राजकीय आणि मानवी विकासाच्या मुद्द्यांवर 100 टक्के सहमती दर्शविली, तेव्हा भारताने केवळ इतिहासच निर्माण केला नाही तर जगासाठी एक संयुक्त सोनेरी भविष्य निर्माण केले. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणाचे फलित आहे.
advertisement
'मोदी है तो मुमकिन है'
भारताने चीनच्या कुटील चाली पूर्णपणे हाणून पाडल्या. हे खरंच चकीत करणारे आहे की, घोषणेचे सर्व 83 परिच्छेद कोणत्याही मतभेद, तळटीप किंवा सारांशाशिवाय जसेच्या तसे स्वीकारले गेले. युक्रेन युद्धाच्या संयुक्त राष्ट्राच्या अध्यायांतर्गत, रशिया आणि चीनला एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा, सीमांचा आणि राजकीय स्वातंत्र्याचा आदर करून आणि अण्वस्त्रांना अस्वीकार्य असल्याचे सांगून मजबूत संदेश देण्यात आला, तर भारतीय डिजिटल पायाभूत सुविधांचा अवलंब करून आर्थिक समावेशाच्या मार्गावर जाण्याचे आश्वासनही देण्यात आले. यासोबतच क्रिप्टोकरन्सीसारख्या जागतिक मुद्द्यावर सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी एकमत निर्माण झाले.
जगाच्या बदलत्या चित्रात भारताने जे अशक्य वाटत होते ते करून दाखवले. हे सोपे नव्हते, पण पंतप्रधान मोदींनी जे करायचे ठरवले ते पूर्ण केले आणि G20 च्या इतिहासात असे निर्णय घेतले गेले जे अशक्य वाटत होते. 'मोदी है तो मुमकिन है' हे यावरुन दिसून येते.
अशक्य गोष्टी PM मोदींनी केल्या संभव
रशिया युक्रेन युद्धादरम्यान संपूर्ण जग दोन भागांमध्ये विभागले होते. अशा वेळी युद्धाच्या या काळात चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, यूरोपीय संघ- सर्वांना एकत्र आणणं हे भारतासाठी मोठं आव्हान होतं. सर्व काही सोपं अजिबात नव्हतं. पण भारताने ते करुन दाखवलं. ज्याची कल्पनाच देखील केली जाऊ शकत नव्हती. पण पंतप्रधान मोदींना अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली. दिल्ली घोषणेवर सर्व विकासात्मक आणि भू-राजकीय मुद्द्यांवर 100% सहमती प्राप्त झाली. G20 नेत्यांनी स्वीकारलेल्या एकमताने युक्रेनमध्ये सर्वसमावेशक, न्याय्य आणि शाश्वत शांततेची मागणी केली आहे आणि सदस्य देशांच्या भागांवर ताबा किंवा कोणत्याही देशाच्या प्रादेशिक अखंडतेविरुद्ध कृती करण्यासाठी ताकदीचा वापर करण्यापासून बचाव करण्याचा आग्रह करण्यात आला.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, युक्रेन संकटाबाबत बाली समिटमध्ये वापरलेली भाषा स्वीकारायला रशिया तयार नव्हता आणि पाश्चिमात्य देशही मागे हटायला तयार नव्हते. या कारणास्तव, भारतात होत असलेल्या G20 शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यावर एकमत होणे शक्य होणार नाही, असे मानले जात होते. मात्र या मुद्द्यावरही एकमत निर्माण करण्यात भारताला यश आले.
मोदी आता ग्लोबल साऊथचे नेते आहेत
आफ्रिकन युनियनला G20 चा कायम सदस्य बनवण्यात यश मिळणे ही G20 बैठकीची सर्वात मोठी उपलब्धी आहे. गेल्या वर्षी बाली शिखर परिषदेत G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली गॅरंटी भारताने आज पूर्ण केली.
ऐतिहासिक निर्णय
G-20 बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे काही केले आहे ज्यामुळे भारताच्या शेजारी देशांना मोठा धक्का बसलाय. चीनने BRI प्रोजेक्टच्या माध्यमातून रस्ते तयार केले आणि भारताने रेल्वे आणि जहाजाने युरोप गाठण्याची ब्लू प्रिंट तयार केली. भारत-मिडिल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) ची घोषणा शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी करण्यात आली. हा कॉरिडॉर अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. या कॉरिडॉरमध्ये अनेक देशांचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रोजेक्ट पार्टनरशिप फॉर ग्लोबल इंफ्रास्ट्रक्चर इन्वहेस्टमेंट नावाच्या उपक्रमाचा भाग आहे.
