आदमपूर हवाई तळ हे पंजाबमधील महत्त्वाचे हवाई तळ आहे. याच हवाई तळावर तैनात असलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. याच ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले.
आदमपूर हवाई तळावर पंतप्रधान मोदी यांनी अचानक भेट दिल्याने हवाई दलाच्या जवानांमध्ये आणखी उत्साह वातावरण निर्माण झाले. पंतप्रधान मोदी यांनी हवाई दलाच्या जवानांना सोबत संवाद साधला. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला जोरदार तडाखा देण्यात आला. त्यानंतर बिथरलेल्या पाकने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ करण्यात आदमपूर हवाई तळाने मोठी कामगिरी बजावली.
advertisement
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सैनिकांमध्ये दाखल झाले. त्यांनी हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सद्य परिस्थितीवर चर्चा केली. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी हवाई दलाच्या वीर जवानांची भेट घेतली. आदमपूर हवाई तळाला प्रत्यक्ष भेट देऊन, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानसह संपूर्ण जगाला एक मजबूत संदेश देण्याचा प्रयत्न केला. जर कोणी भारताकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत केली तर त्याला धूळ चारली जाईल, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी आजच्या भेटीतून दिला.