पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली 7 मार्च रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारने उज्जवला योजनेविषयी महत्वाचा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तब्बल 10 कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की उज्ज्वला योजनेत मिळणारी 300 रुपयांची सबसिडी आणखीन एका वर्षासाठी वाढवण्यात येणार आहे. म्हणजेच 31 मार्च 2025 पर्यंत उज्ज्वला योजनेचा लाभ कुटुंबांना घेता येईल.
advertisement
निवडणुकीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, महागाई भत्त्यात केली वाढ
गुरुवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत उज्ज्वला योजनेबाबतचा निर्णय झाल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर 300 रुपये सबसिडी देण्यात येते, ज्याचा कालावधी 31 मार्च 2024 पर्यंत होता. मात्र आता 1 वर्षासाठी यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली असून त्यात प्रति क्विंटल 285 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. AI मिशन अंतर्गत, 10,372 कोटी रुपयांच्या खर्चासह पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंडिया AI मिशनला मंजुरी देण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ :
गुरुवारी 7 मार्च 2024 रोजी झालेल्या कॅबिनेटची बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी महागाई भत्त्याची टक्केवारी 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे.
