आपल्यासाठी पूर्ण पृथ्वी एका कुटुंबासारखी आहे. कुटुंबात प्रत्येक सदस्याचे भविष्य हे इतरांशी जोडलेले असते. त्यामुळेच आपण एकत्र काम करतो तेव्हा कोणालाही मागे न ठेवता ते करत असतो असं मोदींनी मुलाखतीत सांगितलं. गेल्या 9 वर्षांमध्ये आपण आपल्या देशात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास यावर भर दिला आहे. प्रगतीसाठी आणि विकास शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी याची मोठी मदत झाली. विशेष म्हणजे आज या मॉडेलच्या यशाला आंतरराष्ट्रीय मान्यतासुद्धा मिळाली. जागतिक संबंधांतसुद्धा हेच आमच्यासाठी मार्गदर्शक तत्व असल्याचं मोदी म्हणाले.
advertisement
भारताची अर्थव्यवस्था आणि जागतिक पातळीवर दृष्टीकोनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे ही खूप महत्त्वाची बाब आहे. भारताने हे ज्या पद्धतीने केलं मला वाटतं तेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण इथं एक असं सरकार आहे ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि सरकारचासुद्धा लोकांच्या क्षमतेवर विश्वास आहे.
आमच्यासाठी ही सौभाग्याची आणि सन्मानाची गोष्ट आहे की लोकांनी आमच्यावर अभूतपूर्व असा विश्वास ठेवला. फक्त एकदा नव्हे तर दोनदा लोकांनी बहुमत दिलं. पहिल्यांदा आश्वासनाबाबत होतं तर दुसऱ्यांदा कामगिरी आणि देशासाठी आमच्या भविष्यातील योजनांसाठी होतं असंही मोदींनी म्हटलं.
