उज्जैन : पोलिसांचा कडक स्वभाव हा सर्वांना माहिती असेल. मात्र, पोलिसांचा आणखी वेगळाच आणि कौतुकास्पद मानवी चेहरा समोर आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने पुढाकार घेत एका व्यक्तीचे आयुष्य वाचवले आहे. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात.
मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये एका घटनेने पोलिसांचा माणुसकीचा चेहरा समोर आला आहे. येथे, रस्त्यावर पडलेल्या बेशुद्ध व्यक्तीच्या उपचारासाठी टीआयसह संपूर्ण पोलीस स्टेशनने मदतीचा हात पुढे केला आणि तब्बल 1.75 लाख रुपये जमा करून त्या व्यक्तीवर उपचार सुरू केले.
advertisement
नेमकं काय घडलं -
नीलगंगा पोलीस ठाण्याचे प्रभारी विवेक कनोडिया रात्री पेट्रोलिंग करून सकाळी पार्श्वनाथ शहरातील देवास रोडवरील त्यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी झोपडीत राहणारी एक महिला त्यांच्यासमोर आली आणि तिच्या पतीला काहीतरी झाले आहे, असे तिने सांगितले. यावेळी टीआयने जाऊन पाहिले तर पती झुडपात बेशुद्ध पडलेला होता.
यानंतर टीआय कनोडिया यांनी बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेले. याबाबत बोलताना नीलगंगा पोलीस ठाण्याचे प्रभारी कनोडिया यांनी सांगितले की, हा व्यक्ती वॉचमनवर म्हणून काम करतो. उपचारासाठी पैसे कमी पडल्याने त्यांनी पोलीस स्टेशनच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला आणि मदत मागितली. तसेच कॉलनीतील रहिवाशांचीही मदत घेतली.
आतापर्यंत 1 लाख 75 हजार रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम रुग्णालयात जमा करण्यात आली असून वॉचमनवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. बेशुद्ध झालेल्या चौकीदाराला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या मेंदूतील मज्जातंतू फुटली आहे आणि त्याचे ऑपरेशन केले जाईल.
health tips : झोपेमुळे मणक्यात अन् मानेत दुखत असेल तर काय करावे? जाणून घ्या, ही महत्त्वाची माहिती
दरम्यान, टीआयने कुटुंबीयांना धीर दिला आणि ताबडतोब 60,000 रुपये ऑर्डर करून जमा केले. याबाबत त्यांनी सांगितले की, चौकीदार घराजवळील झोपडीत राहतो. गरीब असल्याने आम्ही त्याला मदत केली. सकाळी 60 हजार रुपये संजीवनी हॉस्पिटलला दिल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनच्या व्हॉट्सॲपवर मदत मागितली. यानंतर लेडी कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टरसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या क्षमतेनुसार मदत केली. मात्र, उपचारासाठी आणखी पैशांची गरज होती. यानंतर आम्ही कॉलनीच्या ग्रुपसह अन्य ग्रुपला मदतीचे आवाहन केले. त्यानंतर तत्काळ 2.25 लाख रुपये जमा झाले, अशी माहिती त्यांनी दिली.